अखेर भाजपची माघार : ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा !

Finally withdrawal of BJP: Rutuja Latke's victory is clear!

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे उमेदवारी मागे घेणार असल्याचेही बाणवकुळे यांनी स्पष्ट केले.

2019 च्या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली. 2019 च्या निवडणुकीत मुरजी पटेल दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर त्यांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. शिंदे गटानेही मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला.

मात्र आता पुन्हा मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पक्षाच्या आदेशाचे पालन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Fact Check: यात्रा राहुल गांधींची, गर्दी नायजेरियाची, सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

 

आमच्यावर कोणताही दबाव नसून आम्ही अर्ज मागे घेतल्याचे मुरजी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मात्र, आता भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अखेर भाजपची माघार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी रात्रीनंतर आज सकाळीही भाजप नेत्यांच्या महत्त्वाच्या बैठका झाल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर शरद पवार यांनीही असेच आवाहन केले. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे.

ऋतुजा लटके काय म्हणाल्या?

निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर ऋतुजी लटके यांनी सर्व राजकीय नेत्यांचे आभार मानले. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ही सर्व कार्यकर्त्यांची आणि माझी इच्छा होती, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी विनंती केल्याबद्दल राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

हे देखील वाचा