बांका : बिहारमधील बांका येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने पैशासाठी अनेकवेळा लग्न केले. अधिक हुंड्याच्या लालसेपोटी पुरुषाने एक, दोन नव्हे, तर तीन लग्ने केली आहेत.
ही घटना बांका येथील भाटुआचक गावातील असून तेथे संजय मंडल नावाच्या एका मध्यमवयीन तरुणाने हुंड्यासाठी एक नव्हे तर तीन लग्न केले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच संजय मंडलची पहिली पत्नी डेझी देवी हिने धनकुंड पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांना माहिती देताना गुन्हेगाराच्या पत्नीने आपले लग्न संजयसोबत झाल्याचे सांगितले आहे. लग्नानंतर सर्व काही सुरळीत झाले.
मात्र काही महिन्यांनंतर संजयने तिच्यासोबत दागिने व पैशाची मागणी करत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि दुसरे लग्न करण्याची धमकी दिली.
महिलेने सांगितले की, यानंतर तिची सासू कलसिया देवी तिला त्रास देऊ लागली. त्यानंतर मुंगेर जिल्ह्यातील अरगंज येथील अमैया येथे संजय मंडल यांचे लग्न झाले आणि दुसरी पत्नी आल्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली.
याच गुन्हेगाराची पहिली पत्नी डेझीने सांगितले की, काही दिवसांनी दुसरी पत्नीही घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. त्यानंतर संजयने तिसरे लग्न करून तिचा छळ सुरू ठेवला.
डेझी पुढे म्हणाली, संजय मंडलने हुंड्याच्या लोभापोटी मुलीची आई असलेल्या रंजू देवी हिच्याशी शिवरात्रीच्या दिवशी लग्न केले.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला तिच्या सासरच्यांसोबत रहायचे आहे, पण सासरचे लोक तिला संपूर्ण मालमत्तेतून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.