राजस्थानमध्ये पर्यटक परदेशी महिलेवर बलात्कार, मसाजच्या नावाखाली आरोपीचे घृणास्पद कृत्य

0
99
accused's heinous act in name of massage

जयपूर, 19 मार्च : राजस्थानच्या जयपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका परदेशी तरुणीवर बलात्कार झाला आहे.

घटना हॉटेल जॉबनेस बाग येथील आहे. आयुर्वेदिक मसाज करण्याच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती आहे. पीडित महिला नेदरलँडची रहिवासी असून ती राजस्थानला भेटण्यासाठी आली होती.

याप्रकरणी सिंधी कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी कॅम्प पोलिस स्टेशनचे एसएचओ गुंजन सोनी यांनी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई केली आहे.

केरळचा रहिवासी असलेल्या बलात्कारी आरोपीला तक्रारीनंतर अवघ्या 4 तासांत अटक करण्यात आली आहे. आरोपी जयपूरच्या खातीपुरा येथे मसाज सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतो.

सदरील घटनेनंतर आरोपी जयपूर सोडून केरळला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

पीडितेच्या वडिलांनी आयपीसीच्या कलम 363,376D आणि कलम 3/4 आणि POCSO कायद्याच्या कलम 16/17 अंतर्गत तीन आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

घटनेच्या 5 दिवसांनंतर त्यांनी रविवारी अहवाल दाखल केला आहे. आशिष, शिवम आणि मुकेश अशी एफआयआर दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.