इम्तियाज यांना मुख्यमंत्री म्हणाले : आता ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव बदलता येणार नाही !

80
Chief Minister said to Imtiaz: 'Chhatrapati Sambhajinagar' name cannot be changed now!

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराबाबत औरंगाबाद कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कृती समितीने मुख्यमंत्री शिंदे यांची सुभेदारी अतिथीगृहात भेट घेतली.

यावेळी जलील यांनी औरंगाबादचे ‘नामांतर’ रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेषत: एमआयएम काळे झेंडे दाखवणार असल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली

इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबादचे नाव ऐतिहासिक आहे. त्यामुळे औरंगाबादचे नाव पर्यटनाबरोबरच प्रत्येक गोष्टीत जगभरात ओळख निर्माण झाले. त्यामुळे हे नामांतर रद्द करा.

याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊन याचिकाही दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. नामांतर रद्द करावे अशी मागणी औरंगाबाद कृती समितीच्यावतीने खा. इम्तियाज जलिल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

आता नाव बदलता येणार नाही

औरंगाबादच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी औरंगाबाद कृती समितीला सांगितले की, छत्रपती संभाजीनगर या नावाचा विषय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यात बदल करणे शक्य नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहर दौऱ्याला रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या दर्शनाने सुरुवात झाली.

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीचे दर्शन घेणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संस्थानच्या गणपतीला सोन्याचा मुकुट अर्पण केला होता.

मोरेश्वर सावे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे नवस फेडण्यासाठी किरण चावडी ते संस्थान गणपतीपर्यंत चालत गेले. शिंदे यांनी या भागातील जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

विशेष म्हणजे आतापर्यंत शिवसेना नेते आल्यानंतरच या ठिकाणी मोठी गर्दी होत होती, मात्र हेच चित्र एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातही पाहायला मिळाले.

छोटे रस्ते, शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने या भागात सतत वर्दळ असते, त्यामुळे पोलिसांनाही सुरक्षेसाठी मोठी अडचण येत होती. यावेळी शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात एकनाथ शिंदे यांचा दौरा शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. इतिहासात लोकमान्य टिळकांनीही संस्थान गणपतीचे दर्शन घेतल्याचे येथील स्थानिक सांगतात.