कोल्हापूर : ‘2024 ला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. मग त्यांनी तिन्ही पक्षाने सोबत यावे की, एकट्याने यावे हा त्यांचं प्रश्न आहे. पण लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकितच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी वर्तवलं आहे.
राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर धनंजय महाडिक यांची कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. तब्बल 3 तास ही मिरवणूक चालली होती. अंबादेवी मंदिरात या मिरवणुकीचा समारोप झाला.
महाडिकांनी सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. यानंतर माध्यमांशी बोलत असताना पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज दिलं.
‘ये तो झांकी है 20 तारीख अभी बाकी है, राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल. उद्या अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. मत दाखवून निवडणूक होती त्यात सुद्धा आम्ही विजयी झालो.
विधानपरिषदेला तर गुप्त मतदान इथे आम्हाला प्रतिसाद जास्त मिळेल. सद्सद विवेकबुद्धीला आम्ही आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांना अनेकांनी हात दाखवून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे राज्यसभेच्या निवडणुकीतच दाखवून दिले आहे, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला.
तसंच, ‘2024 ला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. मग त्यांनी तिन्ही पक्षाने सोबत यावे की, एकट्याने यावे हा त्यांचं प्रश्न आहे. पण लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकितच पाटील यांनी वर्तवलं.
‘ईडी हातात द्या, फडणवीस सुद्धा मतदान करतील हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगणं वाकडे आहे. आमदारांना का नोकर समजता का, बोलवून दम देता, विकास निधी रोखता मी स्वतः याबाबत पिटीशन दाखल करणार आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
औरंगाबादमध्ये घडलेली घटना दुर्दैवी होती. पण, पंकजा मुंडे यांच्यावर खरे प्रेम करणारे कार्यकर्ते असतील तर ते अशी कृत्ये करून पंकजाताईंची प्रगती रोखत आहेत, पक्ष त्या गोष्टीत इंटरटेन करणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.