आठ वर्षात नरेन्द्र मोदीजी यांचेवर एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही : आ. रमेशआप्पा कराड

167

लातूर : आरोग्‍य, शिक्षण याबरोबरच अन्‍न, वस्‍त्र आणि निवारा या मुलभूत गरजा पुरविण्‍याचे काम गेल्‍या आठ वर्षात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केले.

विविध योजनेच्‍या माध्‍यमातून गोरगरीब सर्वसामान्‍य जनतेत आत्‍मविश्‍वास निर्माण करून त्‍यांचे जीवनमान उंचावण्‍याचा आणि त्‍यांना सुखी व समृध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न नरेंद्रभाई मोदी करीत असल्‍याचे प्रतिपादन भाजपा बुध्‍दीजीवी प्रकोष्‍ठ सेलचे प्रदेश संयोजक दत्‍ताभाऊ कुलकर्णी यांनी केले.

जगातील लोकप्रिय नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने गरीब कल्‍याण संमेलनाचे लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात रविवारी आयोजन करण्‍यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून दत्‍ताभाऊ कुलकर्णी बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, अशोक काका केंद्रे, संतोष मुक्‍ता, विक्रम शिंदे बापुराव राठोड, श्रीमती रेखाताई तरडे, जयश्री पाटील, मिनाताई भोसले, मनिष बंडेवार, दिग्वीजय काथवटे, ज्ञानेश्‍वर चेवले, पंडीत सुर्यवंशी, बालाजी गवारे, संध्‍या जैन, गणेश गोमसाळे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास आणि सबका प्रयास या उक्तीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्‍य गोरगरीब जनतेच्‍या कल्‍याणासाठी सुरू केलेल्‍या पंतप्रधान घरकुल आवास योजना, उज्वला गॅस, पंतप्रधान रोजगार, शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा लोन, गरीब कल्याण योजना, अटल पेन्शन योजना, किसान क्रिडीट कार्ड, जनधन योजना, ई-श्रम कार्ड, दिव्‍यांगांना मदत यासह विविध योजनेतील लाभार्थ्‍यांचा या संमेलनात प्रातिनिधीक स्‍वरूपात उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

तर नुकत्‍याच झालेल्‍या राज्‍यसभा निवडणूकीत भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाल्‍याबद्दल कार्यकुशल नेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्‍या अभिनंदनाचा ठराव आ. रमेशअप्‍पा कराड यांनी मांडला त्‍यास गुरूनाथ मगे यांनी अनुमोदन देताच उपस्थितांनी टाळयांच्‍या गजरात ठराव मंजूर केला.

लाखो भाजपा कार्यकर्त्‍याच्‍या मेहनतीने सत्‍तेवर आलेल्‍या नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वातातील केंद्र सरकारने अभ्‍यासपूर्ण नियोजन करून सर्वस्‍पर्शी सर्वव्‍यापी विविध योजना रा‍बविल्‍या.

यामुळे गेल्‍या आठ वर्षात देशात अमुलाग्र बदल झाला असल्‍याचे सांगून यावेळी बोलताना दत्‍ताभाऊ कुलकर्णी म्‍हणाले की, कॉग्रेस राजवटीत ढासळलेली संपूर्ण व्‍यवस्‍था सुधारून सर्वसमावेशक योजनेच्‍या माध्‍यमातून गोरगरीबांना न्‍याय देण्‍याचे काम मोदीजींनी केले आहे.

देशात नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्‍यात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्‍या नेतृत्‍वात आपण काम करातो ही अभिमानाची बाब आहे.

यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, देशात परिवर्तन होवून नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्‍यानंतर त्‍यांनी सर्वसामान्‍य जनतेला केंद्रबिंदू मानून विविध योजना राबविल्‍या.

जात पात धर्म न पाहता खऱ्या लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍याचे काम त्‍यांनी केले. मोदीजींच्‍या काळात योजनांचा लाभ थेट मिळाला मात्र कॉग्रेसच्‍या काळात योजनेतील कांही भागही लाभार्थ्‍यांपर्यंत पोंहचत नव्‍हता.

कोरोनाच्‍या काळात मोदीजींनी केलेली मदत कोणीही विसरू शकत नाही.भारत देश जगाचे नेतृत्‍व करू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी आपल्‍या कार्यातून दाखवून दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर आजपर्यंत कसलाही भ्रष्‍टाचाराचा कसलाही डाग लागलेला नाही. आतापर्यंत एक पैशाचाही भ्रष्‍टाचाराचा आरोप कोणाला करता आला नाही असे बोलून दाखविले.

यावेळी खा.सुधाकर शृंगारे भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून नरेंद्र मोदी यांच्‍या विविध योजनेची माहिती दिली.

प्रारंभी जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी मनिष बंडेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास भाजपाचे गोविंद चिलकुरे, बन्‍सी भिसे, सुभाष जाधव, साहेबराव मुळे, शिवाजी बैनगिरे, अरविंद नागरगोजे, सुशिलदादा बाजपेई, भागवत सोट, तुकाराम गोरे, श्रध्‍दा जगताप, रंजित मिरकले, डॉ. बाबासाहेब घुले, रागीनी यादव, हनुमंतबापू नागटिळक, शाहूराज थिटे, मंगेश पाटील, ज्‍योतीराम चिवडे, गोविंद नरहारे, हणमंत देवकते, शंकर रोडगे, विजय काळे, श्‍वेता लोंढे, आरती राठोड, भिमाशंकर राचट्टे, सुनिल पाटील, सुरज शिंदे, अनंत कणसे, बालाजी गुटे, बालाजी केंद्रे, विश्‍वनाथ चाटे, तानाजी बिराजदार, उषा रोडगे, ललिता कांबळे, अनुसया फड, उषा शिंदे, वसंत करमुडे, राजकिरण साठे यांच्‍यासह लातूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांसह केंद्र शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.