अभिनंदन : जनता हायस्कूल कौठाची यशाची परंपरा कायम

149

कौठा प्रतिनिधी (प्रभाकर पांडे) : कौठा येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे जनता हायस्कूल कौठा या शाळेचा दहावीचा निकाल ९९.१४% लागला आहे.

दहावीच्या बोर्ड परीक्षेला एकूण १२० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी११७विद्यार्थी उतीर्ण झाले.

त्यापैकी विशेष प्राविण्यासह ९४ प्रथम श्रेणीत १९ विद्यार्थी उतीर्ण तर ३ विद्यार्थी बोर्ड परीक्षेत विशेष प्रविण्यासहित उज्जवल यश संपादन केले आहे.

त्यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. संस्थेचे सचिव ओमप्रकाश देशमूख, शाळेचे मुख्याध्यापक जे.पी. मुंडे, पर्यवेक्षक बी.ए.सोनटक्के व सर्व शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.