Thane Police : जितेंद्र आव्हाड यांना अटक करणाऱ्या पोलीस उपायुक्तांची बदली

Thane Police

ठाणे : ठाणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. त्यात उपायुक्त विनयकुमार राठोड यांचाही समावेश आहे. मात्र  जितेंद्र आव्हाड यांच्या अटक प्रक्रियेदरम्यान या बदलीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी  जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत विनयकुमार राठोड यांचाही सहभाग होता.

जितेंद्र आव्हाड यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना दोष देणार नसल्याचे सांगितले. पोलिसांवर दबाव असल्याचेही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड आवाड यांनी डीसीपी विनयकुमार यांच्या बद्दल सांगितले की, त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. मात्र आपण हतबल असल्याचे त्यांच्या देहबोली वरून दिसून येत होते. मात्र याच दरम्यान राठोड यांची बदली झाल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

विनयकुमार राठोड यांची परिमंडळ 5 मधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. या संदर्भात जितेंद्र आवाड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली बढती झाल्याचे सांगितले.

ठाणेकरांसाठी वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ठाणे वाहतूक शाखेतील पद किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत नाही. त्यांच्या कामाचे बक्षीस मिळाल्याचे जितेंद्र आवाड यांनी म्हटले आहे.

तीन उपायुक्तांच्या बदल्या

  • उपायुक्त विनयकुमार राठोड यांची परिमंडळ 5 मधून शहर वाहतूक शाखेत बदली.
  • उपायुक्त सुधाकर पठारे यांची विशेष शाखेतून परिमंडळ 4 मध्ये बदली.
  • उपायुक्त गणेश गावडे यांची मुख्यालय-2 मधून परिमंडळ 1 ठाणे येथे बदली.