Crime News: जालना हादरलं; तरुणी घरात एकटी पाहून तरुणाचा 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

0
24
Crime News

जालना न्यूज : जालना शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

ही घटना 9 जून आणि 18 जून रोजी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने जालना शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील यशवंत नगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 19 वर्षीय युवती घरी एकटी असताना तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

9 जून रोजी याच तरुणाने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करेन’ असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

18 जून रोजी चंद्रकांत घुले, रेखा घुले व अंबादास सुरासे यांनी यशवंत नगर येथे येऊन युवतीला धमकावून बळजबरीने घेऊन मधुबन कॉलनीत डांबून ठेवले व महादेव घुले याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अश्लील छायाचित्र काढून बदनामी करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

महिनाभरानंतर तरुणीने पळून जाऊन आईच्या घरी सर्व प्रकार सांगितला. समाजात बदनामी होऊ नये म्हणून तरुणीने व तिच्या घरच्यांनी मौन बाळगले होते.

मात्र त्या तरुणाने पुन्हा युवतीला अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर पसरवण्याची धमकी देत ​​पुन्हा शारीरिक सुखाची मागणी केली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने मुलीने तिच्या आईसह कदीम जालना पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पिंक मोबाईल पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.