पुणे : येथे आय क्यू आर ए सिविल सर्विसेस अकॅडमी च्या वतीने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता.
या सेमिनार मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना १६ व्या लोकसभेतील उच्च शिक्षित तथा लातूरचे माजी खा.डॉ. सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की, जोपर्यंत विद्यार्थ्यां आपल्यातला न्यूनगंड काढून टाकणार नाहीत. तोपर्यंत त्यांना कसले ही यश मिळणार नाही.
आपण पदवीच शिक्षण घेईपर्यंत पुढे काय करायचं हे ठरवत नाही. परंतु एखादी खेड्यातला विद्यार्थी यूपीएससी करायचा म्हणाला तर लोक त्याला वेड्यात काढतात.
मात्र ‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या बोली भाषेत जर यूपीएससीची तयारी केली तर निश्चितपणे यश हे त्यांना मिळते; असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुनील बळिराम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
देशभरातून या सेमिनारसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रश्न उत्तराच्या तासात आपआपले नाव आणि गाव सांगितल्यानंतर लक्षात आलं की विद्यार्थी हे झारखंड, अयोध्या, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून आणि जिल्ह्यातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या सेमिनारमध्ये जगप्रसिद्ध इतिहासाचे प्रोफेसर अवध ओझा यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये अनेक पैलूचे उदाहरण देत विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी झाले पाहिजे आणि निराश न होता, सतत अभ्यास करून सातत्य कसं ठेवलं पाहिजे याचा कानमंत्र त्यांनी दिला.
पुणे येथील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या सेमिनार मध्ये नुकताच यूपीएससीमध्ये २०२ रँकनी आयएएस केडर मिळालेला लातूरचा विद्यार्थी रामेश्वर सुधाकर सबनवाड यांनी यूपीएससीसाठी केलेल्या तयारीचा इत्यंभूत अशी माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या अनेक शंका असलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिले. यूपीएससीची तयारी कशी केली आणि पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यावर निराश न होता पुन्हा जिद्दीने प्रयत्न करीत दुसऱ्या प्रयत्नातच देशांमध्ये 202 रँकने आयएस केडर यश मिळविल्याची सक्सेस स्टोरी शेअर केली.
अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी समाधान केले. कार्यक्रमासाठी दिल्लीचे सुप्रीम कोर्टातील वकील सुधांशू हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन पुण्याचे फैजल यांनी केले होते.
देशभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास साडेचार तास हा सेमिनार चालला आणि विद्यार्थी एक नवीन ऊर्जा घेऊन गेले कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करून झाले.