उदगीर मतदार संघात महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे करणार : वैशाली मोटे

उदगीर : विधान सभा मतदार संघात महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभी करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षा वैशाली राहुल मोटे यांनी केले.

उदगीर येथे पक्ष संघटनात्मक बांधणीकरिता व आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या दिपाली औटे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.

उदगीर विधान सभा मतदार संघात महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत आहे.

त्यांनी अनेक विकासात्मक कामे करून उदगीर मतदार संघ विकासाचे मॅडेल बनविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या तत्वानुसार आ.संजय बनसोडे ८०% समाजकारण व २०% राजकारण करित आहेत.

आ. संजय बनसोडे यांच्या विकासाचा रथ असाच अविरतपणे चालू राहण्याकरिता महिलांना राजकारणात सक्रिय करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी करणार असा निर्धार या बैठकीत केला.

या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई शिंगडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख यांनी यथोचित मार्गदर्शन उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्याना केले.

प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, शहराध्यक्ष सय्यद इरफान, राकाँपा सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे व सांस्कृतिक विभागाचे उदगीर शहराध्यक्ष अभिजीत औटे आदी उपस्थित होते.

बैठकीचे प्रस्ताविक राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा उर्मिलाताई वाघमारे यांनी तर आभार शहराध्यक्षा दीपालीताई औटे यांनी मानले.

या वेळी जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती गायकवाड जिल्हा उपाध्यक्षा हुसनाबानू शेख, रत्नप्रभा खादीवाले शाशिकला चव्हाण उदगीर शहर उपाध्यक्षा किशाबाई कांबळे आदी उपस्थित होत्या.