कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे भागवत देवसरकर यांची मागणी!
नांदेड : चालू खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महाबीज कंपनीने सोयाबीन बियानाची 30% दरवाढ केली आहे.
मागील वर्षीपेक्षा बियाणांच्या भावामध्ये मोठी वाढ झाली असून महाबीज कंपनीने हि दरवाढ तात्काळ मागे घेऊन सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
यावर्षी शासनाचा महाबीज कंपनीने बियाणाची दरवाढ केल्यामुळे खाजगी कंपन्यांनी देखिल सोयाबिन बियाण्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे.
गेल्या वर्षात बियाण्याचे दर स्थिर होते परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बियांनाच्या किमतीत 30% दरवाढ झाली आहे, पेरणीच्या तोंडावर मोठी दरवाढ झाल्यामुळे मोठा आर्थिक बोजा सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधवांना पडणार आहे.
यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडनार असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महाबीजला बियाणांची दरवाढ तात्काळ मागे घेण्याचं सांगून शेतकर्यांना दिलासा देण्याच काम कराव अशी आग्रही मागणी देखील कृषीमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात भागवत देवसरकर यांनी केली आहे.