Big Breaking | पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची घोषणा

Petrol and diesel will be cheaper now, big decision of Modi government, announcement of Finance Minister

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेट्रोलचे दर 9.50 पैशांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.

कोरोनाचे संकट, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि महागाईचा दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने करात कपात केली आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षीही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय निर्मला सीतारामन यांनीही 50 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.

याशिवाय 12 सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं देखील निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.

यामुळे केंद्र सरकारला वर्षाला १ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सीतारामन यांनी राज्य सरकारांना कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी केले नाहीत.

 निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी काम करत आहोत.

आधीच्या सरकारच्या तुलनेत आमच्या काळातील सरासरी महागाई तेवढीच राहिली आहे. आज आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करणार आहोत.

त्यामुळे पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी कमी होईल, असे सीतारामन यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारच्या महसुलावर वार्षिक 1 लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे त्या म्हणाल्या.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.