पुण्यातील नागरिकांनो सावधान : तुम्ही खरेदी करत असलेले दूध खरोखरच शुद्ध आहे की अशुद्ध नव्हे तर विषारी आहे, अशी शंका आता निर्माण झाली आहे.
कारण पुणे – पिपंरी-चिंचवडसह ठिकठिकाणी दूध पुरवठा करणाऱ्या गोठ्यामालकांनी जनावरांचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी बेकायदेशीर ऑक्सिटोसिन औषधांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 6 गोठा मालकांना अटक केली आहे.
विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (48, रा. पिंपळे सौदागर), सागर कैलास साठ (35, रा. मोशी) विलास महादेव मुरकुटे (57, रा. मारुंजी, मुळशी,) सुनील खंडाप्पा मलकुनाईक (51, रा. धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (50, गुलटेकडी,) महादू नामदेव परांडे (51, दिघी गावठाण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गायी आणि म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन औषधाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय टोळीचा नुकताच पर्दाफाश झाला आहे.
या प्रकरणी जनावरांचे दूध वाढवण्यासाठी संबंधित औषधांचा वापर केल्याप्रकरणी 6 गोठा मालकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 12 वर पोहोचली आहे.
लोहगाव येथील कालवड वस्ती येथे गाई-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा अवैध साठा असल्याची माहिती अंमलबजावणी अधिकारी पांडुरंग पवार यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून घटनास्थळी छापा टाकला असता, शेडमध्ये ऑक्सिटोसिनचा साठा करून द्रावण पॅक करून विक्रीसाठी आणले जात असल्याचे आढळून आले.
आरोपी समीर कुरेशी याने साथीदाराच्या मदतीने अवैध साठा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून तब्बल 53 लाख 52 हजारांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
मुख्य आरोपीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील गोठा मालकांना बेकायदेशीर ऑक्सीटोसिन विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने 6 गोठा मालकांना ताब्यात घेतले.
त्यांनी जनावरांना दूध उत्पादनासाठी ऑक्सीटोसिन टोचल्याची कबुली दिली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलिस आयुक्त पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, पोलिस आयुक्त डॉ. , विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, संदीप शिर्के, सचिन माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते.
गोठामालकच बनले डॉक्टर
पुणे, पिंपरी-चिंचवड, आळंदी परिसरातील गोठा मालकांनी जनावरांचे दूध वाढवण्यासाठी आरोपींकडून अवैध औषधे खरेदी केली. गाई-म्हशींना औषध टोचून त्यांनी दूध वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
संबंधित गोठ्याचे मालक दूध काढण्यापूर्वी जनावरांना टोचून दूध वाढवत असल्याचे समोर आले आहे. ऑक्सिटोसिन औषधाच्या वापरामुळे होणारे आजार औषध वापरून दूध वाढवण्याचा प्रयत्न करणे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
त्यामुळे श्रवणशक्ती कमी होणे, दृष्टीदोष, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गरोदर महिलांमध्ये अनैसर्गिक गर्भपात, त्वचा विकार होण्याची शक्यता असते.
गायी आणि म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन या औषधाचा अवैध वापर केल्याप्रकरणी सहा गोशाळा मालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी जनावरांना टोचून दूध वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. – विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक एक