पुण्यात गायी-म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन औषधाची अवैध विक्री, परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश

Adulteration of cow-buffalo milk in Pune:

Adulteration of cow-buffalo milk in Pune: गायी-म्हशींचे दूध आपण आपल्या घरातील लोकांना विश्वासाने देत असतो, पण पांढऱ्या दुधाची काळी बाजू पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल कि, जे दुध पितोय ते दुध नसून एक प्रकारचे विष आहे.

त्यासाठी दुध उत्पादक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून दुधाचे उत्पादन वाढवत असतात. तुमच्या पायाखालची जमीन सरकावी अशी धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे.

गायी-म्हशींचे दूध काढण्यासाठी ऑक्सिटोसिन औषधाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या विदेशी टोळीचा पुणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक I, विमानतळ पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाईत 53 लाख 52 हजार किमतीचे ऑक्सिटोसिन औषध जप्त केले आहे. कालवडवस्ती परिसरात कारवाई करण्यात आली.

समीर अन्वर कुरेशी (29, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजित सुधांशू जाना (44, रा. पूर्वा बार, एलासपूर, पूर्वा मदिनीनपूर, पश्चिम बंगाल), मंगल कनलाल गिरी (27, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मंडल (44, रा. पूर्वा बार, इलासपूर, पूर्वा मदिनीपूर, पश्चिम बंगाल), 22, रा. नबसन कुस्तिया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हलदर (32, रा. नलपूरकुर, मंडल, 24 परगणा, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी निरीक्षक सुहास सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे अंमलदार पांडुरंग पवार यांना लोहगाव येथील कळवड वस्ती येथे गायी-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी पाटर्य़ा शेडमध्ये ऑक्सीसीन व द्रावणाचा साठा करून ते पॅकिंग करून विक्रीसाठी आणले जात असल्याचे दिसून आले.

आरोपी समीर कुरेशी हा उत्तर प्रदेशातील असून तो त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने अवैध साठा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे ‘मुख्यमंत्रीपद’ गेल्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार आहेत का?

 

मुख्य सूत्रधार कुरेशी हा गोठा मालकांना औषध पुरवठा करत असल्याचेही दिसून आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश खिवंसरा, औषध निरीक्षक आतिश सरकाळे, सुहास सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी जाऊन ज्या गोठ्यात अमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता तेथे जाऊन पाहणी केली.

या औषधाचाही तेथे पुरवठा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोपींकडून तब्बल 53 लाख 52 हजारांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, संदिप शिर्के, सचिन माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली.

जनावरांचे दूध वाढवण्यासाठी संबंधित औषधाचा वापर केला जात असे. मात्र, या औषधातून मिळणारे दूध हे मानवी आरोग्यासाठी हानिकारक असून त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे श्रवणदोष, अंधत्व, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गरोदर महिलांचा रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसन व त्वचारोग असे गंभीर आजार होण्याची शक्यता होती. संबंधित टोळीला अटक करण्यात आली आहे.
– विनायक गायकवाड- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक एक

प्रसूतीसाठी ऑक्सिटोसिनचा वापर

औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी सांगितले की, ऑक्सिटोसिन हे औषध संप्रेरक असून त्याचा उपयोग प्रसूतीसाठी होतो. संबंधित आरोपींविरुद्ध फसवणूक, प्राण्यांवर क्रूरता अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा