उदगीर : महाराष्ट्र राज्याचे मा. गृहराज्यमंत्री तथा उदगीर- जळकोट विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांच्या अथक प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्यामुळे उदगीर – जळकोट विधानसभा मतदारसंघातील १२९ गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत ४८०.८६ कोटी रुपयांची वॉटर ग्रीड योजना मंजूर केली आहे.
या योजनेमुळे अनेक गावांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटविल्याबद्दल त्यांचे जाहिर आभार व्यक्त करण्याकरिता आभार प्रदर्शन समारंभ व सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ जुलै रोजी सकाळी १०: ३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे करण्यात आले आहे.
तरी कार्यक्रमास जास्त जास्त नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीणजी भोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उदगीर शहराध्यक्ष समीर शेख व शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांनी केले आहे.