धनंजय मुंडेंना ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या रेणू शर्माचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

76
Renu Sharma's stay in police custody extended for 'blackmailing' Dhananjay Munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या आणि ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची पोलिस कोठडी सोमवारपर्यंत वाढवली आहे.

मुंबई क्राइम ब्रँचने तिला इंदूरमधून अटक केली होती. धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

रेणू शर्मा यांनी गेल्या वर्षी जानेवारीत धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. काही दिवसांतच तिने तक्रार मागे घेतली होती. धनंजय मुंडे यांनी या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत.

”पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?”अशा आशयाचे मेसेज तिनं मुंडेंना पाठविला होता.

याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

रेणू शर्मा ही मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून करुणा शर्मा यांची बहीण आहे. तिला इंदूर कोर्टाने कोठडी सुनावली आणि गुरुवारी अधिक चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी तिची कोठडी सुनावली.

त्यावेळी न्यायालयाने तिला आज (23) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. रेणू शर्मा यांच्याविरोधात अनेकांनी विविध पोलिस ठाण्यात तक्रारीही केल्या आहेत.