लातूर : लातूर – अंबाजोगाई महामार्गावर सायगाव जवळ झालेल्या भिषण अपघाता संदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन जखमीवर तातडीने आवश्यक ते उपचार करण्याच्या सुचना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविदयालयांच्या अधिष्ठातांना दिल्या आहेत.
लातूर – अंबाजोगाई महामार्गावर शनिवार दि. २३ एप्रिल रोजी झालेल्या भिषण अपघातात ७ जण ठार तर जवळपास १२ जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना मिळताच त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क करुन जखमीवर तात्काळ आवश्यक ते उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
त्या सोबतच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुडे, आमदार संजय दौड यांच्याशी संपर्क करुन अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची विनंती केली.
या अपघातात ७ जण मृत्यू पावल्या बद्दल पालकमंत्री देशमुख यांनी दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे.
अपघातग्रस्तांच्या कुटूंबिया प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघातातील जखमींना सर्व प्रकारचे उपचार तात्काळ उपलब्ध व्हावेत यासाठी निर्देश दिले आहेत.