Raza Academy : रझा अकादमीने म्हटले, मशिदीवरील लाऊडस्पीकर काढणार नाही, पण…

0
32
Raza Academy : रझा अकादमीने म्हटले, मशिदीवरील लाऊडस्पीकर काढणार नाही, पण...

मुंबई : मशिदीवरील भोंग्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. मनसेने मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत काढण्याची मागणी केलीय तर भोंगे काढणार नसल्याची ताठर भूमिका मुस्लिम धर्मीयांनी घेतल्यानं चांगलाच वाद निर्माण होणार आहे.

मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली काढणार नाही, अशी भूमिका रझा अकादमी अध्यक्ष सईद नुरी यांनी घेतली आहे.

रझा अकादमी अध्यक्ष सईद नुरी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे पालन मशिदी कडून केले जाईल. मुंबईतील प्रत्येक मशीदकडे लाऊडस्पीकरची परवानगी आहे.

ज्या मशिदीकडे लाऊड स्पीकरची परवानगी नाही त्या मशिदी लाऊडस्पीकरची परवानगी घेतली जाईल आणि त्यानुसार नमाज लाऊडस्पीकरवर अदा केला जाणार आहे

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्दयावरून मनसे राजकारण करत आहे. त्यांनी तीन एप्रिलचा अल्टिमेटम देऊ देत किंवा कधीचाही मशिदी वरून खाली लाऊड स्पीकर उतरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची काल भेट घेऊन लाऊडस्पीकर संदर्भात परवानगी देण्याची मागणी केली आहे.

अनेक वर्षांपासून नमाज लाऊडस्पीकर अदा केला जातो. परंतु आत्ताच का हा विषय समोर आला आहे? असा सवला देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला.