उदगीर : येथील नामांकित पोस्ते पोदार लर्न स्कूल (सीबीएसई) ची केंद्र सरकार तर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे पूर्ण उदगीर तालुक्यातून निवड करण्यात आलेली ही एकमेव शाळा आहे.
केंद्र सरकार ने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात देशभरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता.
त्यात जिल्हा स्तरावरील शिक्षणअधिकारी यांच्या समितीने पोस्ते पोदार लर्न स्कूलची उदगीर तालुक्यातून निवड केली. दि. ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनी या पुरस्काराचे वितरण लातूर येथे जिल्हा परिषद प्रांगण येथे होणार आहे.
केवळ दर्जेदार शिक्षणच नव्हे तर दर्जेदार स्वच्छतेसाठी देखील या शाळेचे जिल्हा स्तरावर होणारे कौतुक निश्चित उदगीर साठी भूषणावह आहे.
संस्था अध्यक्षा प्रियांका पोस्ते, सचिव सूरज पोस्ते, प्राचार्य सुर्यकांत चवळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.