बिहारमध्येही महाविकासआघाडी | नितीश कुमार पुन्हा 7 पक्षांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री

Maha Vikas Aghadi in Bihar too Nitish Kumar is again the Chief Minister with the support of 7 parties

पाटणा, 9 ऑगस्ट : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी भाजपचा पाठिंबा सोडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करताना नितीशकुमार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही राज्यपालांना दिले आहे.

बिहारच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांची प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया. नितीश कुमार म्हणाले की, 7 पक्षांचे 164 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने महाआघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करत आहे.

यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडी नेते तेजस्वी यादवही उपस्थित होते. नितीश कुमार म्हणाले की, राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख देतील.

नितीश कुमारांना कोणाचे समर्थन?

बिहारमध्ये आरजेडीकडे 79, जेडीयू 45, काँग्रेस 19, डावे 16 आणि एका अपक्षाचे संख्याबळ 160 आहे. या पक्षांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

बिहारमधील पक्षाची ताकद

2020 च्या निवडणुकीत, 243 जागांच्या बिहार विधानसभेत NDA ला 125 जागांवर किरकोळ बहुमत मिळाले. भाजपला 74 जागा, नितीश कुमार यांच्या जेडीयूला 43 जागा, विकासशील इन्सान पार्टीला 4 आणि हिंदुस्थान अवाम पार्टी सेक्युलरला 4 जागा मिळाल्या.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अब्दुल सत्तार यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम कोणी केला?

दुसरीकडे, राजद आणि त्याच्या घटक पक्षांना 110 जागांवर यश मिळाले. बिहारमध्ये 75 जागांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेसला 19 आणि डाव्यांना 16 जागा मिळाल्या. ओवेसींच्या एमआयएमचेही बिहारमध्ये 5 आमदार निवडून आले, त्यापैकी 4 आरजेडीकडे गेले.

Read More