Pankaja Munde v/s BJP: पंकजा मुंडे समर्थकांनी बीडमध्ये प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला

Pankaja Munde v / s BJP: Pankaja Munde supporters block Praveen Darekar's convoy in Beed

Pankaja Munde v/s BJP | बीड: विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक संतापले आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज (दि. 12) बीडमध्ये आले असता पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मुंडे समर्थकांना बाजूला काढले.

आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते आज बीड येथे अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Supria Sule Reaction On Rajya Sabha Election | लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है : सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बीडमध्ये आले होते. दरेकर कार्यक्रमातून बाहेर पडत असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रोखून जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी मुंडे समर्थकांना बाजूला केले. राज्यभरात लाखो समर्थक असूनही भाजप मुंडे भगिनींवर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे संताप व्यक्त करत आहेत.