Supria Sule Reaction On Rajya Sabha Election | लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है : सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

supria Sule Reaction On Rajya Sabha Election

Supria Sule Reaction On Rajya Sabha Election | पुणे : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला.

दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीच्या तिसर्‍या उमेदवाराचा पराभव केला. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र अपक्षांची मते दुभंगल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीला मात्र प्रत्यक्ष निकालात पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. महाविकास आघाडीची काही मते फोडण्यात भाजपला यश आले आहे.

यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने हा रडीचा डाव खेळला, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी या निकालावर दिली.

भाजपने ही रडीची खेळी खेळली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलीचं आहे. आम्ही नाटक करत नाही, आम्ही खूप गंभीरपणे काम करतो. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराने जबाबदारीने मतदान केल्याचेही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनीही भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन केले. भाजपच्या यशात केवळ देवेंद्रजीच नाही तर चंद्रकांत पाटील यांचाही वाटा आहे.

कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, असं मिश्किल उदाहरण ही त्यांनी दिलं आहे.

आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षं ते विरोधात होते तर अर्धी वर्षं सत्तेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडीची एक दोन दिवसांत बैठक होणार आहे. त्यानंतर काय चूक झाली हे स्पष्ट होईल. आम्ही रोज रिस्क घेतो. मी ज्या घरात जन्मले, तिथे यश अपयश मी पाहिले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले.

निवडून आयोगाकडून जे झाले तो बालिशपणा वाटतो. दबाब सगळ्यांवरच आहे. ही निवडणूक आहे, यात काही खात्री आहे का? असा सवाल उपस्थित करत नबाब मलिक आणि अनिल देशमुख यांना डांबून ठेवले, ते दोषी नाहीत, पण निवडणूक जिकण्यासाठी हे केले गेले, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे.