Home Blog Page 325

सीएम ठाकरेंची पीएम मोदींच्या पुरस्काराकडे पाठ; शिवसैनिकांसाठी घेतला निर्णय

CM Thackeray's back to PM Modi's award; Decision taken for Shiv Sainiks

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा आज (२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता षण्मुखानंद हॉल, मुंबई येथे होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींसोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे असे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार होते.

मात्र आता या सोहळ्याकडे मुख्यमंत्री ठाकरे पाठ फिरवणार असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांच्या लढ्याचा अपमान म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा सरकारी कार्यक्रम नसून खाजगी कार्यक्रम आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळास शिष्टाचाराचे बंधन नाही.

गेल्या काही दिवसांपासून  केंद्रीय तपास यंत्रणावर झालेला हल्ला, राणा दाम्पत्य संघर्ष, भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यामुळे शिवसेना आणि भाजप असा संघर्ष मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण घटनेदरम्यान शिवसैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस आंदोलन केले.

या शिवसैनिकांच्या संघर्षाचा अपमान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे कळते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वागताला शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जाणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता मोदी आणि ठाकरे यांच्यातील दरी वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारतात खाद्य तेलाच्या किमती भडकणार? कारण जाणून घ्या !

Will edible oil prices rise in India? Know the reason!

नवी दिल्ली : इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या सर्व निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यामुळे भारतातील तेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूलाचे तेल आणि इतर तेलाच्या किंमतीत वृद्धी झाली आहे. असे असताना इंडोनिशियाच्या या निर्णयामुळे भारत पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे.

इंडोनिशियाने स्थानिक महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच तेलाची टंचाई आणि कच्च्या मालाच्या सर्व निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशिया पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश आहे.

२८ एप्रिलपासून सर्व शिपमेंट्स थांबवण्याचे निर्देश इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी दिली आहे. मात्र टंचाईवर मात झाल्यास आणि महागाई नियंत्रणात आल्यास पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

इंडोनेशियाकडून देशातील वाढत्या महागाईशी लढण्यासाठी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात पाम तेलाचा वापर जास्त प्रमाणात होतो.

डिझेल-पेट्रोलमध्ये मिसळलेल्या जैव-इंधनात देखील पाम तेलाचा वापर केला जातो. जगभरातील सुमारे ५० टक्के घरगुती उत्पादनांमध्ये पाम तेलाचा वापर होतो.

शाम्पू, आंघोळीचा साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिनच्या गोळ्या, मेकअपच्या वस्तू इत्यादींमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो. यामुळे इंडोनेशियाच्या या निर्णयाचा फटका जगभरात बसण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियाच्या निर्णयाचा भारताकडून विरोध

भारतीय व्यापा-यांकडून इंडोनेशियाच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. हा निर्णय पूर्णपणे दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे. पाम तेल जगात सर्वाधिक विकले जाणारे तेल आहे.

जानेवारीत देखील आणली होती बंदी

याआधी जानेवारी महिन्यात देखील इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र नंतर मार्चमध्ये बंदी हटवण्यात आली होती.

निर्णयावर राष्ट्रपती लक्ष ठेवणार

इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी म्हटले आहे की, मी या निर्णयाच्या अमलबजावणीबाबत स्वत: लक्ष ठेवणार आहे. सोबतच या निर्णयाचे मूल्यांकनदेखील केले जाईल.

देशात खाद्यतेलाची उपलब्धता व्यवस्थित व्हावी आणि किमती स्थिर राहाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियात लोक महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी हा घेण्यात आला आहे यामुळे लोकांचा रोष कमी होईल असे तिथल्या सरकारला वाटत आहे.

भाड्याचे घर पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार; रिअल इस्टेट एजंटला अटक 

Crime News | Five, including a woman, arrested for gang rape and assault on an employee in hotel

पुणे : 24 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिला भाड्याचे घर पाहण्यासाठी गेली होती, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

ही घटना शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री घडली, अशी माहिती विमंतल पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली. केशभूषाकार म्हणून काम करणारी ही महिला एका वेबसाइटच्या माध्यमातून ३८ वर्षीय रिअल इस्टेट एजंटच्या संपर्कात आली.

एका आठवड्यासाठी भाड्याने उपलब्ध असलेल्या फ्लॅटबद्दल मी त्याच्याशी मेसेजद्वारे संवाद साधला. शुक्रवारी रात्री आरोपीने महिलेला घर पाहण्यासाठी बोलावले.

जेव्हा ही महिला वाघोली परिसरात पोहोचली तेव्हा फ्लॅटचा मालक येण्याची वाट पाहण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या घरी नेले, असे पीडितेने अधिकाऱ्याला सांगितले. तिथे त्याने तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केला.

महिलेची वैद्यकीय तपासणी

जेव्हा तो आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने कथितपणे तिला तिचे कपडे काढण्यास सांगितले आणि हे सर्व त्याच्या फोनवर रेकॉर्ड केले, पोलिसांनी महिलेच्या तक्रारीचा हवाला देत सांगितले.

त्यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने वॉशरूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर तिने त्या व्यक्तीला आतून बंद केले आणि घराबाहेर पडण्यात यश मिळविले.

महिलेने परिसरातील रहिवाशांना मदत मागितली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

PM Narendra Modi : लता दीदींच्या नावाने मिळालेला पुरस्कार जनतेला अर्पण करतो; मोदींनी जागवल्या दीदींच्या आठवणी

Prime Minister Narendra Modi: Award to the people at the hands of Lata Didi; Memories of sisters awakened by Modi

मुंबई : मी लदादीदींच्या नावाने मिळालेला पहिला पुरस्कार जनतेला समर्पित करीत आहे. लतादीदी जशा जनमानसाच्या दीदी होत्या, तसेच हा पुरस्कारही जनतेचा आहे, असा भावोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Pm modi 2 1

या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबीय आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी भोईवाडा परळ येथील दाभोलकर वाडीला भेट देऊन ज्येष्ठ महिला शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील ताणलेले संबंध समोर आले.

मंगेशकर कुटुंबाचा त्याग

पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संगीतासारख्या गहन विषयाचा मी जाणकार नाही. मात्र, सांस्कृतिक दृष्ट्या संगीत ही साधना आणि भावना आहे असे मला वाटते. अव्यक्तला व्यक्त करतात ते शब्द. ऊर्जेत चेतनेचा संचार करतो तो नाद आणि चेतनेत भाव आणि भावना भरते ते संगीत.

Pm Modi Fnl 1

तुम्ही निस्पृह बसले आहात, पण संगीताचा एक स्वर तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतो. संगीताचा स्वर तुम्हाला वैराग्याचा बोध करू शकतो. संगीताने जीवनात वीररस भरतो.

संगीत मातृत्व आणि ममतेचा अनुबोध करून देतो. संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोधाच्या शिखरावर पोहोचवतो. संगीताच्या या सामर्थ्याला आपण लता मंगेशकरांच्या रूपामुळे साक्षात पाहिलं आहे.

त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव मिळाला आहे. मंगेशकर कुटुंबाच्या प्रत्येक पिढीने या यज्ञात आहुती दिली असल्याचे ते म्हणाले.

यंदाच्या रक्षाबंधनाला दीदी नसेल

लतादीदींच्या आठवणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले. ते म्हणाले की, लतादीदींनी मोठी बहीण म्हणून खूप प्रेम दिले. यापेक्षा अधिक अर्थपूर्ण काय असू शकते? रक्षाबंधन आल्यावर दीदी नसतील.

Pm Modi 8

मी पुरस्कार स्वीकारत नाही, पण माझ्या बहिणीच्या नावाने पुरस्कार स्वीकारतो. म्हणूनच मी आलो. मंगेशकर कुटुंबावर माझा हक्क आहे. आदिनाथचा निरोप आला.

तेव्हा मी किती व्यस्त होतो ते मला दिसले नाही. म्हंटल हो मी नाकारू शकत नाही. हा पुरस्कार मी जनतेला समर्पित करतो. लतादीदी लोकांच्या दीदी होत्या. त्यामुळे हा पुरस्कारही जनतेला अर्पण करतो.

मी विचार करत होतो, माझे माझ्या बहिणीचे नाते किती जुने आहे? कदाचित साडेचार दशके उलटून गेली असतील. माझी ओळख सुधीर फडके यांनी करून दिली.

तेव्हापासून या कुटुंबाशी असलेल्या अपार स्नेहाच्या असंख्य घटना माझ्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत. माझ्यासाठी लतादीदी सूर सम्राज्ञीसोबतचं माझी मोठी बहीण होती. याचा अभिमान आहे, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

साहित्य संमेलनाध्यक्षांचा ‘गाली’नाद!

मराठी-कन्नड-तेलुगू आणि उर्दू भाषांचे गोत्र एकच - परिसंवादातील सूर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की त्यात साहित्यबाह्य राजकीय टीका झालीच पाहिजे असे जणू काही समीकरण झाले आहे. या टीकेवर काही बोलू नका कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हीच तर जागा आहे. जर सरकार हिंदुत्ववादी असेल तर मग या साहित्य संमेलनाच्या मंचावरून सरकारविरोधी बोलण्याला अधिकच चेव चढतो. सरकार जर डाव्या पुरोगामी किंवा स्वयंघोषित सेक्युलर लोकांचे असेल तर मग हिंदुत्वाला शिवीगाळ करण्याला प्रोत्साहन मिळते.

त्यामुळे अ. भा. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक, अध्यक्ष यापैकी कोणीतरी या मंचावरून हिंदुत्ववाद्यांना शिव्या दिल्याशिवाय साहित्याचा नाद पूर्ण होतच नाही. हा नाद आहे. थाळीनाद तसा हा गालीनाद!

उद्‌गीरचे साहित्य संमेलन याला अपवाद कसे असेल? संमेलनाचे उद्घाटक शरद पवार असल्याने त्यांनी जरा संयमाने आडोशाने टीका केली. मात्र संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांना तर शरद पवारांसमोर वैचारिक धुणी धुण्याचा उत्साह होता.

त्यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना ‘छद्मबुद्धी विध्वंसक’ अशी शिवी देऊन टाकली. इतकेच कमी झाले म्हणून की काय कोरोना काळातील त्यांच्या थाळीनादाच्या आवाहनाला एक अतिशय नकारात्मक काळे उदाहरण देऊन आपली शिवी आणखी गडद करण्याचा प्रकार करून टाकला.

काही पुरस्कार परत करण्याची संधी शोधतात तर काही त्यासाठी आधी पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करतात. असे हेतू ओळखण्याइतके शरद पवार चतुर आहेत. त्यामुळे या गालीनादाचे मोल ते करतीलच.

कोरोना हा भीषण रोग भारतात पाय पसरू लागला आणि सामाजिक निर्बंध लादण्याची वेळ येईल असे दिसू लागले. त्यावेळी कोट्यवधींच्या देशात या रोगापासून वाचण्यासाठी काही गोष्टी सामान्य माणसाने पाळाव्या लागतील हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा सामाजिक अर्थात जनता कर्फ्यू घोषित केला होता. लोकांनीच तो पाळायचा होता.

या दिवसभराच्या आत्मनियंत्रणाचा समारोप करताना जे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा करतात त्यांना बळ देण्यासाठी थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अगदी शरद पवार यांनीही कुटुंबासह थाळीनाद केला होता.

भोपाळसारख्या शहरात कोरोनाबाबत चाचणी करायला गेलेल्या परिचारिकांवर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधानांचे हे थाळीवादनाचे आवाहन किती योग्य होते हे अधोरेखित झाले होते. पंतप्रधान मोदी यांना इतका प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने अनेकांची पोटदुखी तेव्हापासून जी सुरू झाली ती अजून थांबलेली नाही.

उद्‌गीर साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी थाळीवादनासाठी पुराणातील एक संदर्भ दिला. ते म्हणाले, ‘थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरेतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये बारा वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन ‘त्राहिमाम्‌’ म्हणत सैरावैरा झाला होता.

भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळ्या वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणार्‍या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.’

कोरोनातील वैद्यकीय सेवाव्रतींच्या आदरासाठी करण्यात आलेल्या थाळीनादावर टीका करताना आणखी यापेक्षा खालच्या पातळीवर घेऊन जाता येणारच नाही. वैचारिक द्वेषाने पछाडले की माणसे किती रसातळाला जाऊन हीन विचार करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. मौलाना रूमी यांच्या…
‘एक हजार क़ाबील आदमी के मर जानेसे इतना नुकसान नही होता
जितना, के एक अहमक के साहिबे एख़तियार होनेसे होता है ’

या ओळी उद्धृत करून हे अध्यक्षमहाशय काय मखलाशी करतात पाहा –
‘अर्थ असा आहे की लष्करातली एक हजार सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं. मात्र, एखाद्या विदूषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर जे नुकसान होतं ते मात्र भरून निघणारं नसतं. ‘अहमक’ म्हणजे विदूषक.

सर्कशीत काम करणारा विदूषक इथे अभिप्रेत नाही. विदूषकवृत्तीचा मूढ. ‘साहिबे एख़तिफार’ म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदूषकप्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे.

मौलाना रूमींनी विदूषकांपासून सावध राहण्याबाबत आपल्याला सूचित केलं आहे. ही प्रवृत्ती क्रूर प्रवृत्ती असते असंही त्यांनी सांगितलं आहे.’

म्हणजे सासणे महाशय या देशातील लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना विदूषक प्रवृत्तीचा मूढ म्हणत आहेत. अहो सासणे महाशय, लोकांनी नरेंद्र मोदींना एकदा नव्हे, दोनवेळा बहुमताचा आकडा वाढवत निवडून दिले आहे.

मोदींनी अगदी ‘मोदी मर जा तू’ असे म्हणणार्‍यांवरही काही कारवाई केलेली नाही. ते संवादाने जग िंजकत चालले आहेत. क्रूर प्रवृत्ती काय असते हे जरा आणिबाणीत ज्यांचा तुरुंगात छळ झाला आहे त्यांना विचारा.

मोदी पहिल्यांदा बहुमताने पंतप्रधान झाल्याक्षणापासून त्यांची प्रतिमा क्रूर, हुकूमशाह, हिटलर अशी रंगविण्याची जणू स्पर्धाच चालली आहे. मात्र प्रत्यक्ष आलेल्या अनुभवानंतर हे सगळे विद्वानांचे गालीनाद सपशेल नाकारून जनतेने मोदी यांना पुन्हा पुन्हा राज्यांमध्ये, देशामध्ये विजयी केले आहे.

सर्वसाधारणपणे लोक मोठ्या संख्येने जे आचरण करतात त्याच्या विपरित आणि विसंगत आचरण करून, अचकट संवाद बोलून विनोद निर्मिती करतात ते विदूषक असतात. ते मूढ असतात.

मुद्दाम ते विसंगत वागत असतात. तसे कोट्यवधी जनतेच्या पसंतीच्या विसंगत मुद्दाम बडबड करणार्‍यांना काय म्हणावे हे जनतेलाच विचारावे लागेल. ते कोणा मौलानाला माहीत नसेल कदाचित.

भारत सासणे यांनी चातुर्याने आपल्याला ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्याला अनुकूल काल्पनिक दंतकथा शोधून त्या सांगत भाषण केले आहे. या देशातील स्वयंघोषित पुरोगाम्यांची एक मोठीच समस्या आहे. त्यांनी रा. स्व. संघ, भाजपा अशा हिंदुत्ववादी संघटनांबाबत एक गाढ गैरसमज घट्ट करून घेतला आहे.

या अंधश्रद्धेतच ते वर्षानुवर्षे जगत आहेत. जगात काय चालले आहे ते न पाहता ही नावे आली की डोळे आणखी मिटून ते शिव्या देत सुटले आहेत.
सामाजिक सन्मान, निवारा, समान सर्वां लाभावा
अन्न, वस्त्र, संस्कार, लाभही समान सर्वां व्हावा
हीच एकता समता, ममता, पथ ऐक्याचा सांधू या
असे म्हणत संघाचे लक्षावधी स्वयंसेवक कसलीही प्रसिद्धी न करता देशात लाखो सेवाकार्ये निरपेक्षपणे करत आहेत.

आपले संपूर्ण जीवन त्यात समर्पित करीत आहेत. आज समाजात मोठे नाव असलेले समाजसेवक आहेत. त्यांच्यापेक्षाही जास्त काम करून या कार्यकर्त्यांचे नावही कोठे नाही. त्यांची ती अपेक्षाही नाही. त्यांनी जिंकला आहे सामान्य माणसांचा विश्वास. हा विश्वास असा आहे की कोणी अध्यक्षपदावरून कोणाला कितीही गालीनाद काढत असला तरी या सामान्य माणसांना माहीत आहे की आपल्या गावात, आपल्या गल्लीत काम करणारा रा. स्व. संघाचा कार्यकर्ता कसा आहे.

त्यामुळे त्यांचा अशा गालीनाद करणार्‍यांवर विश्वास नाही. परिणाम काहीच होत नाही. आज सगळीकडे स्वार्थ आणि भ्रष्टाचार बोकाळलेला दिसत असताना संघाचे कार्यकर्ते नि:स्वार्थपणे काम करतात हे लोकांना अविश्वसनीय आहे. त्यामुळेच तर आसम, त्रिपुरा, मणिपूर अशा राज्यातही परिवर्तन दिसते आहे.

हे परिवर्तन जितके राजकीय आहे त्याच्या कितीतरी पट अधिक सामाजिक आहे. ते ज्यांना पाहायचेच नाही अशा पोथीनिष्ठ, अंधश्रद्ध स्वयंघोषित पुरोगाम्यांना कसे दिसेल? ते आपली वर्षानुवर्षे पाठ केलेली शिव्यास्तोत्रेच म्हणत बसणार.

विशेष म्हणजे सेवाकार्य करणार्‍या संघाच्या कार्यकर्त्यांना राजकीय परिवर्तन, पाठबळ याचीही अपेक्षा नाही. केरळमध्ये एकही हिंदुत्ववादी आमदार निवडून येत नाही. पण तेथेही शेकडो सेवाकार्ये अनेक वर्षांपासून चालू आहेत. या कार्यकर्त्यांना ‘पथ ऐक्याचा सांधू या’ ही आस आहे.

त्याला ‘भारत माता की जय’ हा मंत्र जगात सिद्ध करायचा आहे. लढा करून नव्हे, तर प्रेमाने. कोरोनामध्ये मदत करून आणि योगदर्शन करून जगात भारताची मान ताठ झाली तसे.

सध्या भारतातील विरोधी पक्षात एक फॅशन निघाली आहे. कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार करणारे आपले काळे धंदे उघड होऊ लागले की चौकशी करणार्‍यांवर हिटलरशाहीचा आरोप करून मोकळे व्हायचे.

हेच लोक जिथे सहज शक्य असेल तेथे कालपर्यंत ज्यांना हिटलर म्हणून हिणवत होते, त्यांना स्वत:च्या हाताने सत्तेत मुख्यमंत्रिपदी बसवून मोकळे होतात. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून जीवनमूल्यांचे ज्ञान देत एखादा साहित्यिक अध्यक्ष थालीनादाचे नाव काढत गालीनाद करू लागतो तेव्हा कोण विश्वास ठेवणार?

पालघरला जेव्हा जैन साधूंची हत्या झाली तेव्हा हे ‘पुरस्कार वापसी गँग’चे लोक कसल्या सेक्युलर पट्‌ट्या तोंडाला लावून गप्प होते. सतराशे साठ दंतकथांमध्ये भारत सासणे यांना पालघरची दीर्घकथा आठवलीच नाही हे विशेष! काल्पनिक कथेतील थाळी घेऊन भीक मागणारे सासणे यांना आठवले.

मात्र, कोरोनात ऑक्सिजनअभावी नाशिकला तडफडून मेलेले आठवले नाहीत? पुण्यात ऑक्सिजन अभावी मरण पावलेला पांडुरंग नावाचा पत्रकार आठवला नाही? काहीही झाले तरी फक्त हिंदुत्ववादी पंतप्रधानांना शिव्या देण्याचा पण केला होता की काय?

वैचारिक टीका जरूर करावी. गेल्या सात वर्षांत अशी टीका करण्याची मोकळीक आहेच. ही मोकळीक दिली नाही, कोठेही टीका केल्याबद्दल कोणी विरोध केला असे एकही उदाहरण नाही.

मात्र तरीही टीका करण्याचे स्वातंत्र्य नाही अशी ओरड केली जात आहे. ज्या व्यासपीठावरून भारत सासणे ही टीका करीत होते त्याच मंचावरचे उद्घाटक शरद पवार यांचे काय? महाविकास आघाडी सरकारवरच्या टीकेला त्यांनी कसे स्वीकारले?

त्यांनी ‘महाविकास आघाडी सरकारवर टीका करणार्‍या अर्णब गोस्वामी याला आवरा’ असे सुचविल्याचे आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात लिहून जाहीर केले आहे. टीका करणार्‍यांना आवरा असे सांगितल्यानंतर अर्णव गोस्वामी याला, अतिरेक्याला अटक करावी तसे कसलीही नोटिस न देता घरी कमांडो घेऊन जाऊन अटक करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चपराक देत त्यांची सुटका केली.

त्याच शरद पवार यांच्या उपस्थितीत हे महाशय मोदी यांना विदूषक, विध्वंसक म्हणतात आणि तेच शरद पवार आपल्या भाषणात देशात हिटलरशाही येत असल्याचे तितकेच निर्ढावलेपणाने सांगतात! व्वा रे व्वा!

अशा प्रकारच्या विरोधाभासाने आणि विसंगतीने जनतेचा आता प्रसारमाध्यमांवरचा आणि साहित्यिकांवरचा विश्वास उडत चालला आहे. जनतेच्या मनात काय आहे याचा अंदाज ना साहित्यिकांना येत आहे ना प्रसार-माध्यमांना येतो आहे. त्यामुळेच निवडणूकपूर्व अंदाज वारंवार सपशेल खोटे ठरत आहेत.

साहित्यिक म्हणून मान मिळायचा असेल, पुरस्कार मिळायचे असतील तर िंहदुत्ववादी चळवळ, संघटना, सरकारे यांच्यावर जितकी खालची पातळी गाठणे शक्य असेल तितकी गाठून टीका करणे अनिवार्य झाले आहे. कोणताही कार्यक्रम असो, कोणतीही भूमिका असो तेथे आपली वैचारिक गाठोडी सोडायची आणि ती धुणी धुण्याचा कार्यक्रम करत पाणी गढूळ करून टाकायचे हाच यांचा एकमेव धंदा झाला आहे.

अर्थात परिणामशून्य कापूसकोंड्याची दीर्घकथा भारत सासणे यांच्यासारखे साहित्यिक स्वत:च्या फायद्यासाठी, समाधानासाठी सांगत असतात हे आता सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

सौजन्य : दिलीप धारूरकर
दैनिक तरुण भारत, नागपूर

Crime News : धक्कादायक, प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराकडून अनैसर्गिक अत्याचार

Crime News

नाशिक : प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराने अनैसर्गिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना मुंबईनाका परिसरात उघडकीस आली आहे.

शिवाजी साळवे असे त्या नराधमाचे नाव आहे. शिवाजीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दीड वर्षापासून शिवाजी साळवेसोबत तिचे प्रेमसंबंध आहेत.

दोघे एकत्र राहत असताना त्याची नजर 11 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवरती होती. शिवाजी हा प्रियेसी कामावर गेल्यानंतर पीडित बालिकेसोबत अनैसर्गिक कृत्य करत होता.

त्याने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले होते. दमदाटी करत शिवाजीने मुलीच्या लहान भावाला हे असे कृत्य करण्यास भाग पाडत त्याचेही चित्रीकरण मोबाईलमध्ये केले.

मुलीला त्रास झाल्यानंतर हा प्रकार आईच्या लक्षात आला. यानंतर आईने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याने संशयिताचा माग काढत त्याला अटक केली आहे.

दोघे लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत होते

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ही 28 वर्षीय विवाहित महिला मूळ रहिवासी आहे. तिला पहिल्या पतीपासून अकरा वर्षाची मुलगी असून पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिने दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केला.

त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक कलह वाढू लागल्याने तिने विभक्त राहत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दीड वर्षापासून महिला विभक्त राहत आहे.

घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ती दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह- इन- रिलेशनमध्ये नाशिक येथे राहू लागली. आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी तिने धुणीभांडीची कामे सुरू केली.

जेव्हा महिला कामावर जात असे, तेव्हा तिचा प्रियकर तिच्या अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.

नराधमावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

नाशिकच्या बजरंगवाडी भागात राहणाऱ्या महिलेने आमच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात ती, तिचा प्रियकर शिवाजीच्या सोबत लिव्ह इन रिलेशशिपमध्ये राहत होती.

या महिलेला अधीच्या पती पासून 11 वर्षाची मुलगी आहे. ही महिला जेव्हा कामानिमित्त घराबाहेर जात होती, तेव्हा शिवाजी हा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.

हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू होता. जेव्हा मुलीने ही बाब आईला सांगितली, तेव्हा त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली.

आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून काही तासात संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

नराधमाला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील लोहकरे यांनी सांगितले आहे.

Baghpat UP : बागपतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चर्चच्या पास्टरला अटक

Crime News

बागपत : यूपीच्या बागपत जिल्ह्यात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथील एका चर्चच्या पास्टरवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

ही घटना जिल्ह्यातील चंदीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील चर्चसमोर राहणाऱ्या एका कुटुंबाने हा आरोप केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. त्यामुळे पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

आईचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका गावात शाळेजवळ एक अनुसूचित जातीचे कुटुंब राहते. त्यांना 11 वर्षांची मुलगी आहे.

पीडित मुलीच्या आईने आरोप केला आहे की तिच्या मुलीला शाळेच्या मॅनेजिंग चर्च पास्टरने पैशाचे आमिष दाखवले होते. आणि नंतर तिला एका खोलीत नेले, जिथे आरोपीने तिला गलिच्छ फिल्म दाखवून तिचा विनयभंग केला आणि बलात्कार केला.

आरोपींची पोलिस चौकशी

पीडितेने घरी जाऊन कुटुंबीयांना माहिती दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चर्च पास्टरला अटक केली आहे. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला.

आरोपी शाळा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.

गुन्हा दाखल करून पीडितेचे मेडिकल

दरम्यान, सीओ खेकरा विजय चौधरी यांनी सांगितले की, 23/4/22 रोजी एका व्यक्तीने चंदीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की तिच्या अल्पवयीन मुलीवर चर्चच्या पास्टरने बलात्कार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

Cyber Crime News। मुख्याध्यापक सेक्स्टॉर्शन रॅकेटचा बळी, अनोळखी व्यक्तीसोबत न्यूड व्हिडिओ कॉल केला आणि नको ते घडले !

Man Killed Sister In Law

Cyber Crime News । मुंबई : इंटरनेटच्या क्रांतीनंतर केवळ मुंबईतच नाही तर देशभरात डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. आता एका शाळेचा मुख्याध्यापक सेक्सटोर्शन रॅकेटचा बळी ठरला आहे.

अखेर मुख्याध्यापकांना पोलीस ठाणे गाठावे लागले. याप्रकरणी मुख्याध्यापकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेने शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. मग संपर्क वाढला.

त्यानंतर मुख्याध्यापकांना ईमेल पाठवून बिटकॉइनची मागणी करण्यात आली. अन्यथा त्यांचा सर्व डेटा उघड होईल, असा इशारा देण्यात आला. या गोंधळामुळे मुख्याध्यापक घाबरले. त्यांनी पोलीस ठाणे गाठून सायबर पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.

भयानक

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाने बीकेसी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापक सेक्सटोर्शन रॅकेटचा बळी ठरला आहे.

मुख्याध्यापकाकडून ऑनलाइन खंडणीची मागणी करण्यात आली. बिटकॉइनसाठी 1200,000 डॉलरची खंडणी मागितली होती. मात्र खंडणी मागण्यापूर्वी मुख्याध्यापकावर जे घडले ते भयंकर होते.

नग्न व्हिडिओ कॉल

एके दिवशी एका महिलेने शाळेच्या मुख्याध्यापकांना तिच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉलमध्ये ही महिला मुख्याध्यापकांसमोर नग्न अवस्थेत दिसली.

तिने मुख्याध्यापकांना कपडे उतरवण्यास सांगितले. पुढचे काही दिवस त्या महिलेने मुख्याध्यापकांच्या गप्पा आणि फोनला प्रतिसाद दिला नाही. मग एके दिवशी मुख्याध्यापकांना ई-मेल आला. या ईमेलद्वारे खंडणीची मागणी करण्यात आली होती.

तुम्ही केलेली न्यूड व्हीडीओ रेकॉर्ड केले गेले आहे. माझे म्हणणे ऐकले नाही तर ‘तो’ व्हीडीओ इंटरनेटवर व्हायरल होईल. असे होऊ द्यायचे नसेल तर 1200 डॉलर किमतीचे बिटकॉईन द्या, अशी धमकी मुख्याध्यापकाला देण्यात आली.

आश्चर्याची बाब म्हणजे मुख्याध्यापकाचा ई-मेल, त्यांचे संपूर्ण प्रोफाइल, संपूर्ण डेटा, पीसी हॅक झाल्याचा दावाही मेलमध्ये करण्यात आला होता.

सावधगिरीची गरज

सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. पण मी या सर्व धमक्यांकडे दुर्लक्ष केले.

जर कोणी तुम्हाला आपल्याकडे सर्व माहिती असल्याचा दावा करून कोणीतरी आपली फसवणूक करू शकते. तुम्ही अश्लील वेबसाईट पाहता, असा मेसेज आल्यावर लोक आणखी गोंधळतात. मात्र, या सर्व प्रकारात दक्षतेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Tech News : गुगल पाठोपाठ आता Truecaller बंद करणार ‘ही’ सुविधा

Tech News: Following Google, Truecaller will turn off this feature

Tech News : गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) कालच (23 एप्रिल) आपल्या काही पॉलिसींमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहिर केला होता.

यांतर्गत ते 11 मेनंतर आपल्या स्टोअरवरुन कॉल रेकॉर्डिंग करणार्या सर्व थर्ड पार्टी अॅप्सना डिलिट करणार आहेत. वापरकर्त्यांची प्रायव्हसी व कॉल रेकॉर्डिंगबाबत विविध देशात असलेल्या विविध नियमांच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात येत असल्याचा अंदाज आहे.

त्याच्या दुसर्याच दिवशी ट्रू कॉलरनेही (Truecaller) कॉल रेकॉर्डिंग थर्ड पार्टी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ज्या मोबाईलमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची (Call recording) सुविधा आहे, त्याना पूर्वी प्रमाणे कॉल रेकॉर्डिंग करता येणार असून त्याच्यावर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही.

दरम्यान, ट्रू कॉलरने सांगितले, की अपडेट करण्यात आलेल्या गुगल डेव्हलपर प्रोग्राम पॉलिसीनुसार, आम्हीदेखील आता रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात असमर्थ आहोत.

ज्या मोबाईलमध्ये पहिल्यापासून रेकॉर्डिंगची सुविधा इनबिल्ट आहेत, त्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

युजर्सच्या तीव्र मागणीच्या आधारावर आम्ही सर्व अँड्रोइड फोनवर रेकॉर्डिंगची सुविधा देण्याला सुरवात केली होती, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

काय आहे नवीन रेकार्डिंग पॉलिसी?

गुगलने आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्याच्यामुळे इतर सर्व थर्ड पार्टी ॲप्स डिलिट होणार आहेत.

दरम्यान, असे असले तरी सध्याच्या कॉल रिकॉर्डिंगच्या सुविधांवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ज्या कॉल रेकॉर्डिंग सुविधा मोबाईलमध्ये इनबिल्ट आहेत, त्याच्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगलकडून सांगण्यात आल्यानुसार, नवीन पॉलिसीमुळे एक्सेसिबिलिटी एपीआय डिझाईन केली गेलेली नाही व त्यामुळे रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग केली जाउ शकत नाही.

आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत विविध अँड्रॉइड व्हर्जनमध्ये कॉल रेकाँर्डिंग करणार्या एपीआयला गुगलकडून हटविण्यात येणार आहे.

विविध देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंगबाबत वेगवेगळे नियम लावण्यात आले असल्याने गुगलकडून हा निर्णय गुप्ततेच्या धोरणाला अनुसरुन घेण्यात आला आहे.

गुगल कॉल रेकॉर्डिंगच्या विरोधात

दरम्यान, बहुतेक वापरकर्ते कॉल रेकॉर्डींग सुविधांसाठी गुगलच्या प्ले स्टोअरवर जाउन त्या ठिकाणाहून एखादी ॲप डाउनलोड करतात. परंतु यामुळे प्रायव्हसी धोक्यात येउन हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत.

गुगल अनेक वर्षांपासून रेकॉर्डिंगच्या विरोधात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

दरम्यान, यामुळेच कंपनीने आपल्या डायलर ॲपवर काल रेकॉर्डिंगचे एक फिचर दिले आहे. ज्या माध्यमातून काल रेकार्ड झाल्यास, ‘हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे’ अशी सूचना दोन्ही बाजूने बोलत असलेल्यांना समजते व ते सावध होतात.

मराठी साहित्यिकांत संशोधन करण्याची वृत्ती कमी : अतुल देऊळगावकर

Lack of research in Marathi literature: Atul Deulgaonkar

उदगीर : (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी) : संतांचा फक्त जयघोष आणि उदोउदो करण्याची मराठी साहित्य आणि साहित्याकांची वृत्ती आहे आणि ते एक प्रकारचे थोतांड आहे, प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे अनुकरण ते करतच नाहीत. पर्यावरणीय लेखनात संशोधन करून ते लोकांसमोर मांडण्याची मराठी साहित्यिकांची वृत्ती नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी (दि. २३ एप्रिल) छत्रपती शाहू महाराज सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ येथे आयोजित ‘मराठी साहित्यात निसर्गचित्रणच आहे, पर्यावरण नाही’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

कोल्हापूरचे गोमटेश्वर पाटील, औरंगाबादचे अनिरुद्ध मोरे, प्रा. डॉ. किरण वाघमारे, डॉ. अनिता तिळवे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे आणि संमेलन समन्वयक रमेश अंबरखाने व्यासपीठावर होते.

देऊळगावकर म्हणाले, माणूस आणि पर्यावरणाची फारकत झाली आहे. ती का झाली याचा शोध घेण्याची गरज आहे. जगभरातील पर्यावरण तज्ञांनी पुढील पिढीला हरित वने बघायला मिळतील की नाही, अशी शंका त्यांच्या साहित्यातून उपस्थित केलेली आहे. इतर प्राण्यांना आणि निर्जीव वस्तूंना या जगात राहण्याचा अधिकारच नाही अशा अविर्भावात माणूस जगत आहे.

त्यामुळे तो निसर्गाला ओरबाडून संपवायला निघाला आहे. जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या तर यात आघाडीवर आहेत. आधी मानवाला निसर्गाचा आदर करायला शिकवायला हवे. संस्कृती आणि निसर्गाचा ऱ्हास हातात हात घालून चालले आहेत. आपल्या प्रगतीच्या व्याख्येत किंवा मॉडेलमध्येच काहीतरी खोट आहे.

मराठी साहित्यिक निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर लिहिताना केवळ स्वतःच्या अनुभवाचा आणि जीवनाचा विचार करतो, त्यापलीकडे जाऊन पर्यावरणावर संशोधनात्मक लिखाण होत नाही. परखड असले तरी सत्य हेच आहे.

गोमटेश्वर पाटील म्हणाले, जगभरातील आणि मराठी साहित्यात सौंदर्यवाद आहे, परंतु निसर्गवाद नाही. साधारण १९७८ पासून पर्यावरणविषयक चळवळ जगभरात दिसून येते. मध्ययुगात, संत युगात आपल्याकडे निसर्ग वर्णने दिसतात. कादंबरीतही निसर्ग वर्णने आहेत, मात्र त्यांचा उपयोग केवळ कथानक पुढे नेण्यासाठी होतो. तो पुरेसा नाही.

पर्यावरणीय जाणीवेतून निसर्गाचा उल्लेख साहित्यात व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून अनिरुद्ध मोरे म्हणाले की, झाडाला देवत्व देण्याची गरज नसून, त्यांची आपल्याला जैविक गरज आहे. मराठी साहित्यात निसर्गाचा उल्लेख आहेच, मात्र तो पर्यावरणीय जाणीवेतून होण्याची गरज आहे.

प्रा. डॉ. किरण मोरे म्हणाले की, मराठी साहित्यात निसर्गाचे चित्रण आहे, तसेच ते पर्यावरणाचेही आहे. मात्र त्याकडे आपले लक्ष जात नाही. लीळाचरित्रापासूनच चक्रधर स्वामींनी पर्यावरणाचा विषय समाजासामोर मांडला आहे. तर डॉ. अनिता तिळवे यांनी भारतीय संस्कृतीतील पर्यावरण आणि झाडांचे महत्त्व अधोरेखित केले.

संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ना. संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक माणूस पर्यावरणवादी झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या मतदारसंघात त्यासाठी उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.