Tech News : गुगल पाठोपाठ आता Truecaller बंद करणार ‘ही’ सुविधा

63
Tech News: Following Google, Truecaller will turn off this feature

Tech News : गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) कालच (23 एप्रिल) आपल्या काही पॉलिसींमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहिर केला होता.

यांतर्गत ते 11 मेनंतर आपल्या स्टोअरवरुन कॉल रेकॉर्डिंग करणार्या सर्व थर्ड पार्टी अॅप्सना डिलिट करणार आहेत. वापरकर्त्यांची प्रायव्हसी व कॉल रेकॉर्डिंगबाबत विविध देशात असलेल्या विविध नियमांच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात येत असल्याचा अंदाज आहे.

त्याच्या दुसर्याच दिवशी ट्रू कॉलरनेही (Truecaller) कॉल रेकॉर्डिंग थर्ड पार्टी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ज्या मोबाईलमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची (Call recording) सुविधा आहे, त्याना पूर्वी प्रमाणे कॉल रेकॉर्डिंग करता येणार असून त्याच्यावर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही.

दरम्यान, ट्रू कॉलरने सांगितले, की अपडेट करण्यात आलेल्या गुगल डेव्हलपर प्रोग्राम पॉलिसीनुसार, आम्हीदेखील आता रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात असमर्थ आहोत.

ज्या मोबाईलमध्ये पहिल्यापासून रेकॉर्डिंगची सुविधा इनबिल्ट आहेत, त्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

युजर्सच्या तीव्र मागणीच्या आधारावर आम्ही सर्व अँड्रोइड फोनवर रेकॉर्डिंगची सुविधा देण्याला सुरवात केली होती, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

काय आहे नवीन रेकार्डिंग पॉलिसी?

गुगलने आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्याच्यामुळे इतर सर्व थर्ड पार्टी ॲप्स डिलिट होणार आहेत.

दरम्यान, असे असले तरी सध्याच्या कॉल रिकॉर्डिंगच्या सुविधांवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ज्या कॉल रेकॉर्डिंग सुविधा मोबाईलमध्ये इनबिल्ट आहेत, त्याच्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगलकडून सांगण्यात आल्यानुसार, नवीन पॉलिसीमुळे एक्सेसिबिलिटी एपीआय डिझाईन केली गेलेली नाही व त्यामुळे रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग केली जाउ शकत नाही.

आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत विविध अँड्रॉइड व्हर्जनमध्ये कॉल रेकाँर्डिंग करणार्या एपीआयला गुगलकडून हटविण्यात येणार आहे.

विविध देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंगबाबत वेगवेगळे नियम लावण्यात आले असल्याने गुगलकडून हा निर्णय गुप्ततेच्या धोरणाला अनुसरुन घेण्यात आला आहे.

गुगल कॉल रेकॉर्डिंगच्या विरोधात

दरम्यान, बहुतेक वापरकर्ते कॉल रेकॉर्डींग सुविधांसाठी गुगलच्या प्ले स्टोअरवर जाउन त्या ठिकाणाहून एखादी ॲप डाउनलोड करतात. परंतु यामुळे प्रायव्हसी धोक्यात येउन हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत.

गुगल अनेक वर्षांपासून रेकॉर्डिंगच्या विरोधात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

दरम्यान, यामुळेच कंपनीने आपल्या डायलर ॲपवर काल रेकॉर्डिंगचे एक फिचर दिले आहे. ज्या माध्यमातून काल रेकार्ड झाल्यास, ‘हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे’ अशी सूचना दोन्ही बाजूने बोलत असलेल्यांना समजते व ते सावध होतात.