लातूर : जिल्ह्यातील 700 मशिदी आणि 1200 मंदिरांच्या अधिकृत नोंदी असून त्यापैकी केवळ 350 मंदिरांनीच लाऊडस्पीकर वापरण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.
या सर्व मागणी करणाऱ्या संघटनांना पोलीस प्रशासनाने अटी व शर्तींच्या आधारे लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी दिल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
राज्यात सध्या प्रचंड खळबळ उडाली असून राज्याचे राजकारण भलते तापले आहे. या पार्श्वभूमीवर पवित्र रमजान महिना दोन दिवसांवर आला आहे. या अनुषंगाने धार्मिक स्थळांवर लाऊड स्पीकर वाजविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत आहे.
या संदर्भ कायद्यातील तरतुदींमध्ये काही निर्बंध आहेत. त्यामुळे काही गोष्टींवर बंधने नाहीत. त्यासाठी परवानगी लागते. या परवानगीने आपण सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.
लाऊड स्पीकरच्या आवाजाची मर्यादा किती आहे?
सध्या भोंग्याच्या मुद्द्यावरून काही गोटात वाद सुरू आहे. त्यामुळे काही लोक आक्षेप घेत आहेत. याबाबत काहींना शंका आहे. प्रत्येकाने कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केला; तर हे स्पष्टपणे लक्षात येईल की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्पीकरच्या वापरावर बंदी नाही, तर स्पीकरच्या आवाजाची मर्यादा किती असावी याचे निर्देश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.