शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून शिक्षिकेवर बलात्कार

Bijnor brute raped 15 year old girl and blackmailed her by making an obscene video.

बुलडाणा, 2 मे : शिक्षकी पेशाला कलंकित करणारी घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उघडकीस आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिशिक्षिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

शाळेत ये-जा करताना आरोपीने पीडितेशी ओळख करून घेतली. याच ओळखीचा फायदा घेत आरोपींने शिक्षिकेवर अत्याचार केला आहे. नराधमाने शिक्षिकेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेचा अश्लील फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करून तो फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खामगाव येथील ३६ वर्षीय पीडित शिक्षिका तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहे.

तर ४६ वर्षीय आरोपी शिक्षक हा पीडित शिक्षिका ज्या गावात काम करत आहे, त्या गावाजवळील एका शाळेत कार्यरत आहे. श्रीकांत वानखडे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी हे आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये काम करत असल्याने शाळेला जाताना ते खामगाव शहरात येत होते.  ते शिक्षकांच्या कारने खामगावरुन ये-जा करायचे. त्यातून दोघांमध्ये चांगली ओळख झाली होती.

दरम्यान, आरोपी शिक्षकाने काही कारणे सांगून पीडित शिक्षिकेला आपल्या घरी बोलावले. पीड़िता आरोपीच्या घरी आल्यावर त्याने घराचा आतील दरवाजा बंद केला. यावेळी पीडितेने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तिला त्याचा वाइट हेतु लक्षात आला होता.

त्यामुळे तिने घराबाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. यावेळी आरोपी वानखेडे याने चाकूचा धाक दाखविल्याने भीतीने पीडिता गप्प बसली. त्यानंतर पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्याच दरम्यान आरोपींनी आपत्तीजनक स्थितीत पीडितेचे फोटो काढले. घटनेबाबत कोणाला सांगितल्यास पतीला फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.

या घटनेनंतर पीडित महिला पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. अखेर तिने या प्रकरणातील आरोपींविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. पीडितेने तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई केली.

पोलिसांनी आरोपी शिक्षक श्रीकांत वानखेडे याच्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (क), (ब) आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींस हातकड्या लावल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.