Mission 144 : नववर्षाच्या सुरुवातीला भाजपचा नवा कार्यक्रम, जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचे आयोजन

Mission 144 : BJP's new program beginning of New Year, JP Nadda on Maharashtra tour, organizing various programs
  • 2024 च्या निवडणुकीसाठी भाजप तयार, भाजपची रणनिती काय? 
  • ‘मिशन 144’ चा शुभारंभ

चंद्रपूर : भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे. त्यासाठी त्यांनी नव्या मिशनची घोषणा केली आहे. त्यांनी ‘मिशन 144‘ ची घोषणा केली आहे.

या ‘मिशन 144’ चा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा चंद्रपूर दौरा करणार आहेत. यासाठी जेपी नड्डा उद्या म्हणजेच 2 जानेवारी रोजी चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत.

जेपी नड्डा यांचे चार्टर्ड फ्लाइटने सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर त्यांना चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या महाकाली देवीचे दर्शन होईल.

त्यानंतर सिव्हिल लाइनच्या न्यू इंग्लिश मैदानावर नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. बैठकीनंतर नड्डा भाजपच्या ‘लोकसभा टीम’शी संवाद साधून औरंगाबादला रवाना होतील.

Child Investment 2023 : मुलांच्या भविष्यासाठी चिंता नको, नवीन वर्षात गुंतवणूक करा

 

या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी नड्डा यांची ही भेट महत्त्वाची आहे. या दौऱ्यासाठी चंद्रपुरात विशेष तयारी करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

तत्पूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाला भेट देऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनेच्या विविध समस्या हाताळण्याबाबत चर्चा केली.

आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा चंद्रपुरात येत आहेत. चंद्रपूर भाजपच्या वतीने नड्डा यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

हे देखील वाचा