शिवाजी महाविद्यालयात विद्रोही साहित्य संमेलनाची बैठक संपन्न

उदगीर : शिवाजी महाविद्यालय येथे विद्रोही साहित्य संमेलन पूर्वतयारीसाठीची बैठक संपन्न झाली. उदगीर येथे दि. 23 व 24 एप्रिल रोजी जिल्हा परिषद मैदानावर 16 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार असून त्या संदर्भात आज (दि.30) पूर्वतयारी बैठक संपन्न झाली.

सदरील बैठक शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे डॉ. प्राचार्य विनायक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम खादरी यांनी विद्रोही साहित्य संमेलना विषयीचे प्रास्ताविक मांडून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

तसेच व्याख्याते सिद्धेश्वर लांडगे यांनी विद्रोही विचार व चळवळ महात्मा चार्वाक, बुद्ध, बसव, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ते अद्यावत आ.ह. साळुंखे, मा.म.देशमुख, कॉम्रेड शरद पाटील, वामनदादा कर्डक या पुरोगामी परिवर्तनवादी बहुजन महापुरुषांची विचारधारा आहे.

विद्रोही साहित्य संमेलन उदगीर मध्ये होत आहे याचा आनंद सर्व उदगीरवासियांना आहे असे ते म्हणाले.

या बैठकीतील प्राध्यापकांच्या सूचना व कल्पना स्वीविकारु संमेलन यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे म्हणाले.

या बैठकीस उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. जगताप, प्रा.आर. मांजरे, प्रा.निहाल खान, डॉ.बालाजी सूर्यवंशी, डॉ.सुरेश शिंदे, डॉ.विश्वंभर गायकवाड, डॉ. विजयकुमार जाधव, डॉ. एच. डब्लू. कूलकर्णी, डॉ. सूर्यकांत सांवत, संभाजी ब्रिगेडचे बाबासाहेब एकुर्केकर व यासीन शेख उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या सूचना व कल्पना ऐकून नियोजन करण्यात येईल असे डॉ.अंजुम खादरी यांनी म्हटले.