नागपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. डिझेल टँकर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर वाहने पेटली.
आगीत जळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रक चालकालाही आपला जीव गमवावा लागला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपुर-मूल रोडवर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या ट्रकमध्ये लाकूड भरल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.
Nine people charred to death in a fire that broke out after a collision between a diesel-laden tanker and a truck carrying wood on the outskirts of Chandrapur city in Maharashtra, police official said
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2022
गुरुवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला
चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार म्हणाले, चंद्रपूर शहराजवळील अजयपूरजवळ डिझेलने भरलेला टँकर लाकूड घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडकला. अपघातानंतर आग लागली असून त्यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात आली
अपघातानंतर सुमारे एक तासानंतर अग्निशमन दलाचे जवान अजयपूर येथे पोहोचले आणि काही तासांनी आग आटोक्यात आणण्यात आल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
नंदनवार म्हणाले की, मृतांचे मृतदेह नंतर चंद्रपूर रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहने अडवण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक बंबांनी रात्रभर काम केले.