सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Gujarat Congress Working President Hardik Patel) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते. मला विश्वास आहे की जनता या निर्णयाचे स्वागत करेल, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वी हार्दिक पटेलसोबत चर्चा केली होती.
गुजरातमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते येत्या दोन आठवड्यांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
तीन वर्षांत काँग्रेस सोडली
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, हार्दिक पटेलने 12 मार्च 2019 रोजी कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. केवळ 19 महिन्यांच्या छोट्या कारकिर्दीत हार्दिक पटेलला गुजरात कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले.
शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मात्र, हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांडसमोर आपल्या मागण्या मांडत राहिले. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोपही हार्दिकने केला.
काँग्रेस विरोधाच्या राजकारणापुरतीच मर्यादित
हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पत्र सादर केले. ‘अनेक प्रयत्न करूनही काँग्रेस पक्षाने देश आणि समाजहिताच्या विरोधात केलेल्या कामांमुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे’, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
त्यांनी पुढे लिहिले की, “देशातील तरुणांना सक्षम आणि कणखर नेतृत्व हवे आहे, परंतु काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणापुरता मर्यादित आहे.” त्यामुळे देशातील जनतेला विरोध नको, भविष्याचा विचार करणारा पर्याय हवा आहे.
हे देखील वाचा
- Elections Big Update | महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे निर्देश
- Big Breaking News | पावसाळा संपल्यानंतर महापालिका निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- Gyanvapi Masjid SC Hearing : नमाजात व्यत्यय आणू नये, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते सुरक्षित ठेवा, सुप्रीम आदेश; हिंदू पक्ष आणि सरकारला नोटीस