Gyanvapi Masjid SC Hearing : नमाजात व्यत्यय आणू नये, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते सुरक्षित ठेवा, सुप्रीम आदेश; हिंदू पक्ष आणि सरकारला नोटीस 

152
Gyanvapi Masjid SC Hearing: Namaz not interrupted, keep place where Shivling is safe, Supreme court Order

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान ज्या भागात शिवलिंग असल्याचा दावा केला होता तो भाग सुरक्षित करावा, असे निर्देश दिले. न्यायालयाने यासंदर्भात वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

त्याचवेळी, मुस्लिमांना ज्ञानवापी मशिदीमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय नमाज अदा करता येईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

याशिवाय याचिकाकर्त्या हिंदू भाविकांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणीसाठी आता १९ मेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

उदयपूरच्या चिंतन शिविरात सोनिया गांधी यांची घोषणा काश्मीर ते कन्याकुमारी ‘भारत जोडो यात्रा’

दरम्यान, वाराणसी जिल्ह्यातील एका न्यायालयाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशीद संकुलाचा काही भाग सील करण्याचे निर्देश दिले, जिथे शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता.

त्याच वेळी, ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले आहे त्या ठिकाणी लोकांना प्रवेश करण्यास मनाई करावी आणि मशिदीमध्ये केवळ 20 लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

प्रत्यक्षात 14 ते 16 मे दरम्यान ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर कनिष्ठ न्यायालयाने उपासकांची संख्या मर्यादित केली होती.

त्याचवेळी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ट्रायल कोर्टाला या खटल्याच्या सुनावणीपासून रोखण्याची मागणीही व्यवस्थापनाने केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने खटल्याला स्थगिती दिली नाही.

हे देखील वाचा