पत्नीला कार शिकवताना पती, पत्नी आणि मुलगी हे तिघांचाही दुर्दैवी अपघात

Husband, wife and daughter have an unfortunate accident while teaching their wife how to drive

बुलढाणा : बुलढाण्यात एक गंभीर घटना घडली आहे. बायकोला चालवायला आणि कार शिकायला गेलेल्या एकाची गाडी थेट विहिरीत जाऊन कोसळली.

ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. या कारमध्ये पती, पत्नी आणि मुलगी असे तीन जण होते. मात्र अचानक कारने वेग घेतला आणि नियंत्रण सुटल्याने ती थेट विहिरीत पडली.

या घटनेत पत्नी आणि मुलगी बुडाल्याचा संशय आहे. काया विहिरीत पडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तातडीने कुटुंबाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील एका कुंभाराची घटना आहे. विहिरीत पडलेल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या पतीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. नाका-तोंडात पाणी येत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पत्नी व मुलगी अद्याप सापडलेली नाही.

गावाच्या मधोमध एक विहीर असल्याने गाडी चालवताना ताबा सूटल्याने ही दुर्दैवी घटना घडली असावी, असे बोलले जात आहे. कुंभारी येथील विहिरीभोवती नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. उर्वरित दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.