Shivshakti Bhimshakti : राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?

Shivshakti Bhimshakti :

Shivshakti Bhimshakti : प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दोन्ही पक्ष आपापल्या पक्षीय पातळीवर त्याची चाचपणी करत आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर 20 नोव्हेंबरला मुंबईत प्रबोधनकार ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत.

येथून ही चर्चा पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. मात्र, आंबेडकरांनी यावर सध्या मौन बाळगणेच पसंत केले आहे. 1995 साली राज्यात महायुतीचे सरकार आले.

Raj Thackeray’s Mega Plan : पुणे महापालिकेसाठी राज ठाकरेंचा मेगा प्लान, तब्बल 3500 ‘राज’ दूतांची नियुक्ती करणार

 

त्यावेळी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली होती. शिवसेना, भाजप आणि रिपाई यांची युती झाली होती. पुढील 25 वर्षे ती युती होती.

बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि 2017 मध्ये पहिल्यांदाच महायुती तूटली. महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप लढत झाली. मात्र, त्यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेऐवजी भाजपसोबत राहणे पसंत केले.

2019 मध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले. पण, निवडणुकीच्या निकालानंतर चित्र पालटले. भाजप-शिवसेनेत पुन्हा फूट पडली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि दोन महिन्यांपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी सेनेत बंड केले. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे मातोश्रीवर बैठका घेत आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही नवे मित्र मिळाले आणि आता नवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन नवे समीकरण निर्माण झाले तर राजकीय समीकरण बदलणार आहे. खरे तर याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी या आघाडीवर भाष्य केले होते.

आता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि युती बद्दल देखील चर्चा करू शकते. पण, मग प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर. राष्ट्रवादीकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

त्या सोबतच काँग्रेसचीही नाराजी असू शकते. कारण, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादींसोबत युतीचा प्रस्ताव अनेकदा मांडला होता.

मात्र त्यांच्यात पुढे काहीही झाले नाही, फक्त चर्चा झाली. तेव्हा आता जर शिवसेनेने वंचितला सोबत घेतले तर माविआचे काय होणार? त्यावर राज्याचे राजकारण ठरणार आहे.

हे देखील वाचा