मुंबई : काही राज्यांमध्ये मास्कची सक्ती करण्यात आल्याने आणि कोरोना संसर्ग दिसून येत असल्याने राज्य सरकार पुन्हा अलर्ट मोडवर (Government Again on Alert Mode) आले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी (PM Modi) राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतली आहे. त्यानंतर राज्य सरकारचा पुढील आराखडाही आरोग्यमंत्री राजेश टोपे (HM Rajesh Tope) यांनी जाहीर केला.
मास्कबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakrey) घेतील असेही ते म्हणाले. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क बाबत मोठा निर्णय होण्याची अपेक्षा होती.
मात्र, मास्कबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे यांनी आजच्या बैठकीनंतर सांगितले. तसेच मास्क घालण्याचे आवाहन केले आहे पण सक्ती नाही, असे टोपे म्हणाले.
तसेच कोरोना स्थितीचा आढावा घेतला, पॉजीटिव्ह रेट 0.3 वरून 0.7 वर गेला आहे. आम्ही कोरोना संसर्ग आणि रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून आहोत, असे टोपे म्हणाले.
इतर महत्त्वाचे निर्णय
आजच्या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतील बचत 250 कोटी रुपये आहे.
वैद्यकीय सुविधा नसलेल्या १९ जिल्ह्यांना ही रक्कम देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. कॅन्सर आणि हृदयविकारासाठी आज मंत्रिमंडळात मोठी तरतूद करण्यात आली आहे, टोपे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील सध्याची कोरोनाची आकडेवारी अद्याप चिंतेचे कारण नाही. त्यामुळे मास्कबाबत कोणताही मोठा निर्णय झालेला नाही.
लसीकरण पूर्ण करण्यावर आणि बूस्टर डोस देण्यावरही सरकार भर देत आहे. संभाव्य धोका ओळखून सरकार पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.
ऊस उत्पादकांना मोठा दिलासा
ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे पासून सुरू होणाऱ्या ऊस कारखान्यांना प्रतिटन 5 रुपये अनुदान देण्यात आले आहे.
तसेच प्रतिटन 200 रुपये अनुदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इंधन दरवाढीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.
इंधन दरवाढीवरून मोदींशी झालेल्या चर्चेनंतर अनेक राजकीय आरोप केले जात होते. आज मोठा निर्णय अपेक्षित होता. मात्र आज कोणताही निर्णय झालेला नाही.