नवी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखेचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येक गोष्ट पैशाने किंवा खोक्याने विकत घेता येत नाही.
समोर बसलेले खरे शिवसैनिक आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात बीज रोवले, असे विजय शिवतारे म्हणाले होते. तुझे नशीब फुटले आहे. तुम्ही फुटला नाहीत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मी संजय असल्याने काय चालले आहे ते मला माहीत आहे.
संजय राऊत म्हणाले, शिवसैनिक, महिला आघाडी, तरुण सगळेच भक्कम आमच्या सोबत व सेने सोबत आहेत. हे वातावरणात सध्याच्या राजकीय वातावरणात दिसून येते. शिवसेना सोडली कोणी? कोणी गेले नाही. दोन-चार दलाल गेले असतील.
ते सगळे घाबरून पळून गेले आहेत. आमचे सरकार आले तर इथेच परत दिसतील. ते आमच्याकडे अर्ज घेऊन सगळ्यात आधी येतील. शिवसेना हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे. जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
नवी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संजय राऊत म्हणाले, शिवसेना एक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते. इतरांनी गट तयार केले असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.
शाखेचे उद्घाटन करण्यात आले. खासदार राजन विचारे आहेत. संपर्क प्रमुख निलेश पराडकर आहेत. सर्व अधिकारी आपआपल्या जागेवर भक्कम उभे आहेत.
कडवे शिवसैनिक आहेत. तोपर्यंत शिवसेनेचे एकही बाल बांका होऊ शकत नाही. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. त्यांच्या बळावर ही शिवसेना पुढे जाईल.
हे देखील वाचा
- Tunisha Suicide : तुनिषाचा मेकअप करतानाचा सहा तास जुना फोटो झाला व्हायरल, या अवस्थेत दिसली अभिनेत्री
- TATA IPL Mini Auction 2023 : आयपीएल लिलाव संपला, सॅम करन सर्वात महाग, मयंक अग्रवाल सर्वाधिक कमाई करणारा भारतीय
- समता संदेश पदयात्रेचा कुरुळा येथे 25 डिसेंबर रोजी उद्घाटन सोहळा
- Chanda Kochhar Arrested : सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला का केली अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण