नागपूर : आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभ कार्य करताना आपण प्रथम गणेशाची पूजा करतो. आज आपण नागपुरात आहोत. त्यामुळे टेकडीच्या गणपती बाप्पाला माझा नमस्कार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली आणि जनतेशी संवाद साधला.
समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो आणि नागपूर एम्स रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचेही कौतुक केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
विकासाचे 11 तारे
नरेंद्र मोदी म्हणाले, आज 11 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच महाराष्ट्राच्या नक्षत्रात 11 तारे जोडले गेले आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले, आज 11 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच महाराष्ट्राच्या नक्षत्रात 11 तारे जोडले गेले आहेत.
समृद्धी महामार्ग हा पहिला तारा आहे. नागपूर एम्स रुग्णालय हा दुसरा तारा आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण तसेच, दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन हा तिसरा तारा आहे.
त्यांतर अशाच प्रकारे राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था, चंद्रपूरमधील ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र हे ते 11 तारे आहेत. या ताऱ्यांमुळे महाराष्ट्राचा विकास लखलखणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विकासाचे हे 11 तारे महाराष्ट्राच्या विकासाला नवी उर्जा, गती देतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन.
रोजगार निर्मिती होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज महाराष्ट्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन हे दुहेरी इंजिनचे सरकार राज्यात वेगाने काम करत असल्याचा पुरावा आहे.
समृद्धी महामार्गामुळे केवळ नागपूर-मुंबईच नाही तर राज्यातील २४ जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हिटीने जोडले जातील. शेतकरी, उद्योजक, विविध धार्मिक स्थळी जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
विरोधकांवर निशाणा साधला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासात शॉर्टकट वापरतात. हे देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक आहे.
काही पक्षांची विकासाची कामे म्हणजे आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया अशी आहेत. यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असेही मोदी म्हणाले.
विकासाला मानवी चेहऱ्याची गरज
केवळ पायाभूत सुविधा निर्माण करणे म्हणजे विकास नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर, त्याला मानवी चेहरा देखील आवश्यक आहे. या विकासासाठी मानवी संवेदना आवश्यक आहेत.
आज नागपुरात सुरू झालेल्या सर्व प्रकल्पांमध्ये हीच स्थिती होती. नागपूर एम्स रुग्णालयामुळे रुग्णांना मोठी सोय होणार आहे तर समृद्धी महामार्गामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे.