बीड : लग्नाचे आमिष दाखवून दोनवेळा धर्म परिवर्तनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्ञानेश्वर नागरगोजे हा मोहम्मद शहजाद मनोहर झाला होता. अवघ्या सहा दिवसांनंतर, त्याने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा आपला इरादा जाहीर केला.
ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी बीड तालुक्यात घडल्याची माहिती मिळाली. पैसे स्वीकारून मुस्लिम मुलीशी इस्लाम लग्न लाऊन देण्याचे आश्वासन देऊन धर्मांतर केल्याचे समोर आले आहे.
नेमके काय घडले?
ही घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडवा गावात घडली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने हिंदूतून मुस्लिम आणि पुन्हा मुस्लिमातून हिंदूमध्ये धर्मांतर केले आहे. ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे, वय ३५ असे या तरुणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वरने बॉण्ड पेपरवर लिहिलं होतं की तो इस्लाम धर्म स्वीकारत आहे. त्यांनी 11 फेब्रुवारी रोजी जाहीरनामा जाहीर केला.
सहा दिवसांनंतर,17 फेब्रुवारी रोजी, त्याने लग्नाच्या पैशाचे आमिष दाखवून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा करणारा आणखी एक नोटरीकृत बाँड जारी केला आहे. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बीडमध्ये यूपीतील धर्मांतराची लिंक
बीडमध्ये धर्मांतराचा धागा सापडण्याचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अवैध धर्मांतराचे प्रकरण गाजले होते. यूपीतील धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीडमध्ये असल्याची धक्कादायक माहिती गेल्या वर्षी समोर आली होती.
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी इरफान खान नावाच्या तरुणाला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. इरफान हा मूळचा बीडमधील परळी तालुक्यातील आहे.