चंदीगड : पंजाबच्या लुधियानामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथे एका 11 वर्षाच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला. पीडितेच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे केले होते. पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी एका कारखान्यात काम करते. ती तिच्या कुटुंबासोबत राहते, तिला आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी परिसरात राहणाऱ्या महिलेला याबाबत सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांना मदत करण्याऐवजी त्या तरुणाला मदत केली. पिडीतेच्या कुटुंबियांना त्याच्याकडून पैसे मिळवून देते असे सांगितले.
त्यानंतर पीडितेला घेऊन गेली, पुन्हा तिच्यावर अत्याचारही करण्यात आला. कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका करण्यात आली.
त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला, जिथे तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले तिथे हा प्रकार उघड झाला. हा प्रकार उघडकीस येताच संबंधित तरुण फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.