Crime News : मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलाची हत्या, मुलीच्या भावाचा क्रूरपणा

69
Crime News: Murder of a Hindu boy marrying a Muslim girl, brutality of the girl's brother

हैदराबाद : हिंदू तरुणाने मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याने तरुणाची भर रस्त्यात हत्या झाल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. सरुनगरमध्ये नागराजू नावाच्या तरुणाला त्याच्या मेव्हणाने भर रस्त्यात बेदम मारहाण केली.

नागराजूवर लोखंडी रॉडने वार करून मारहाण करण्यात आली, नंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

नागराजू पत्नी सुलतानासह सरूरनगरच्या दिशेने दुचाकीने जात होता. त्यावेळी तहसील कार्यालयाजवळ दोघांनी नागराजू यांच्यावर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला केला. नागराजू यांच्या पत्नीसमोर त्यांची हत्या करण्यात आली.

नागराजूच्या कुटुंबीयांनी सुलतानाच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हिंदू संघटनांनीही रिंगणात उडी घेतली आहे.

आर्य समाज मंदिरात हा विवाह पार पडला

नागपाजू हे रंगारेड्डी जिल्ह्यातील मापरपल्ली गावचे रहिवासी होते. सुलताना शेजारच्या घनापूर गावात राहत होती. दोघे सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या लग्नाला सुलतानच्या घरचा विरोध होता.

31 जानेवारी रोजी पळून गेल्यानंतर नागराजू आणि सुलताना यांचा लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात विवाह झाला. नंतर त्यांनी सुलतानचे नाव बदलून पल्लवी केले.

दोन आरोपींना अटक

नागराजू हा एका कार शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. त्याने 4 महिन्यांपूर्वी सुलतानाशी लग्न केले होते. हल्ल्याच्या वेळी सुलताना घटनास्थळी हजर होती. तिचा भाऊ आणि तिच्या काही मित्रांनी हा हल्ला केल्याचा आरोप तिने केला आहे.

या प्रकरणी सुलतानाचा भाऊ आणि मेहुण्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत बिलासपुरम नागराजू आणि त्यांची पत्नी सुलताना हे एकाच महाविद्यालयात शिकत होते.

या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि या वर्षी जानेवारीत त्यांनी लग्न केले होते. सुलतानाचे नावबदलून पल्लवी केले होते. सुलतानाचा भाऊ या लग्नामुळे नाराज होता, त्यामुळे ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भाजपाकडून प्रकरणाची चौकशीची मागणी

तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. मारेकरी कुटुंबातील सदस्य होते का, कोणत्या धार्मिक गटाने आरोपींना असे करण्याचा सल्ला दिला होता किंवा त्यांना काही आर्थिक मदत केली होती का, याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.