तुमकूर (कर्नाटक) : अवघ्या पाच महिन्यांपूर्वी एका २५ वर्षीय तरुणीशी लग्न करून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या एका व्यक्तीने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तुमकूरच्या कुनिगल तालुक्यातील अक्कीमारी पल्या येथे ही घटना घडली.
शंकरप्पा (45) असे मृताचे नाव आहे. शंकरप्पा त्यांच्या गावाच्या अंगणात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ऑक्टोबर २०२१ मध्ये शंकरप्पाने मेघनाशी लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
25 वर्षीय तरुणीशी लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर तो विवाह व्हायरल झाला. त्यावेळी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.कौटुंबिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
लग्नाशिवाय ४५ वर्षे राहिले
शंकरप्पा यांचे ४५ वर्षे लग्न झाले नव्हते. हे जाणून मेघनाने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हे मान्य करून शंकरप्पाने गावातील मंदिरात मेघनाशी लग्न केले. हे लग्न खूप चर्चेचा विषय ठरले होते. तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
आधीचा पती दोन वर्षांपासून बेपत्ता
मेघनाचे हे दुसरे लग्न केले होते. तिचे आधी लग्न झाले होते, तिचा पती गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असून तो पत्नीला भेटू शकलेला नाही. तेव्हा त्याची वाट पाहून अखेर मेघनाने शंकरप्पासोबत लग्न केले.
कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या
25 वर्षीय तरुणीशी झालेले लग्न सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर बरीच उलटसुलट चर्चा देखील झाली होती. मेघनाचे सासू सोबत सतत वाद होत होते.
मेघनाने शंकरप्पा यांच्या नावावर असलेली अडीच एकर जमीन विकण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सासूला ते मान्य नव्हते. त्यामुळेच शंकरप्पा यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी हुलीयूरदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी त्याने चिट्ठी लिहिली असून, ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.