Nanded Crime News : नराधम पित्याने चार वर्षाच्या मुलाला गोदावरीत दिले फेकून

Crime News

नांदेड : जिल्ह्यातील कंधार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी माधवराव देवहरे हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. 28 मार्च रोजी चार वर्षांच्या मुलाला गोणीत बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची घटना घडली होती.

ही घटना ३१ मार्च रोजी उघडकीस आली. कंधार पोलिसांनी आरोपीच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 28 मार्चला अभिषेक शाळेतून घरी न परतल्याने त्याची आई आणि नातेवाईकांनी 29 मार्च रोजी कंधार पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

पोलिस निरीक्षक पडवळ, उपनिरीक्षक इंद्राळे आदींनी नरनाळी (ता. कंधार) गाठून चौकशी केली. माधव चौकशीदरम्यान अस्पष्ट उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी ‘हिसका’ दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांनेच गोदावरी नदीत फेकून दिले असल्याचे कबूल केले. तो नेहमी म्हणायचा की माझा लहान मुलगा माझा नाही. 28 रोजी त्यांनी मुलगा अभिषेक याला गोणीत बांधून नायगाव तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरून फेकून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर हे ऐकून कुटुंबीयांनाही जबर धक्का बसला.

पोलिसांनी माधवला 30 मार्च रोजी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कसून तपास करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आरोपी माधव देवहरे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी माधव याला पोलिसांनी अटक केली आहे. अपहरणाचा कट रचला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. माधव देवरे याने त्यांचे अपहरण केल्याचा बनाव रचला होता. त्यांने कुटुंबातील इतर सदस्यांसोबत अभिषेकचा शोध देखील घेतला होता.

मात्र तो न मिळाल्याने त्यांनेच कंधार गाठून मुलाला आमिष दाखवून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार केली. कंधार पोलिसांनी मिसिंग झाल्याची नोंद केली होती. मात्र सुरुवातीपासूनच पोलिसांना माधव देवहरे यांच्यावर संशय होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना खात्री पटली.