Big Power Crisis in Maharashtra : राज्यावर मोठे विजेचे संकट; खुद्द ऊर्जामंत्र्यांनी चिंता व्यक्त केली

Big Power Crisis in Maharashtra: Big power crisis in the state; The energy minister himself expressed concern

Big Power Crisis in Maharashtra | औरंगाबाद : देशासमोर कोळशाचे संकट आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढा कोळसा साठा आहे. त्यामुळे राज्यात मोठे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

तीन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याने राज्यात वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्राने कोळसा न दिल्यास विजेचे मोठे संकट निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

नितीन राऊत म्हणाले, “अनेक राज्यात लोडशेडिंग सुरू आहे. काही प्रमाणात आपल्या राज्यातही करावे लागेल यात शंका नाही. उष्णता वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे.

लोडशेडिंग टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे पण लोडशेडिंग अत्यल्प असेल. वीज दरवाढीबाबत बोलताना नितीन राऊत म्हणाले की, राज्यात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे.

दरवर्षी विजेच्या दरात थोडीफार वाढ होत असली तरी फारसा फरक पडणार नाही. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, याबाबत लवकरच खुलासा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोडशेडिंग सुरू असल्याचे मान्य केले आहे. मात्र दुसरीकडे वीजचोरीच्या घटनाही घडत आहेत. इथे येण्यापूर्वी मी त्याचा आढावा घेतला. मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मात्र, लोडशेडिंग अटळ आहे. लोकांनी पैसे भरले तर बाहेरून वीज विकत घेता येईल, असेही नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

कोळशाची उपलब्धता कमी आहे, विजेसाठी पाणी नाही असे दुहेरी संकट असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे हायड्रो विषय आता संपला आहे, आता फक्त थर्मलवर अवलंबून राहावे लागेल.

कोळसा आणि वीजपुरवठ्याबाबतचे संपूर्ण चित्र उद्या स्पष्ट होईल, आम्ही नियोजन करत आहोत. कोल इंडिया शेटजींप्रमाणे काम करत आहे. पगार द्या, व्याज द्या असे ते म्हणत आहेत हे योग्य नाही.