पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पतीने पत्नी आणि सासूवर हल्ला केला आहे. ही घटना वाल्हेकरवाडी रोड परिसरात आज दुपारी घडली.
सुभाष नामदेव गायवाड यांनी पत्नी रुपाली गायकवाड आणि सासू मंगल दळवी यांच्यावर हल्ला केला आहे.
हल्ल्यातील रुपाली गायकवाड आणि मंगल दळवी या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी पती सुभाष नामदेव गायकवाड याला निगडी पोलिसांनी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्यात रुपाली गायकवाड आणि मंगल दळवी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर मोरया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.