रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदी नोंदणीची मुदत ३० एप्रिलपर्यंत

0
72
Registration period for purchase of paddy and coarse grains for rabi season is till 30th April

मुंबई : पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे ते 30 जून, 2022 असा कालावधी निश्चित केला आहे.

तसेच भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.