मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात 1 तासाहून अधिक काळ झालेल्या बैठकीनंतर आता महाविकास आघाडीची बैठक होत आहे. प्रकाश आंबेडकरांचा ‘युतीचा’ प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे या बैठकीला पोहोचले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत चौथा पक्ष सहभागी होणार आहे.
माविआ यांची लवकरच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सुभाष देसाई, अशोक चव्हाण, छगन भुजबळ दाखल झाले आहेत.
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात दीड तास चर्चा झाली. यानंतर माविआच्या बैठकीत वंचितचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केली होती.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित करावा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे म्हणाले, महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी हे चांगले पाऊल ठरेल. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
त्यानुसार शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी समविचारी पक्ष व नेत्यांना सोबत घेऊन आघाडी मजबूत करण्याचे काम करावे. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन काम केल्यास त्याचे निश्चितच स्वागत होईल. ही आनंदाची बाब आहे.
हे देखील वाचा
- Maharashtra Update : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वाची भेट, काय झाली चर्चा ?
- Loksabha Election 2024 Preparation : गुजरात निवडणुकीनंतर भाजपचे ‘टार्गेट’, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
- Roasaheb Danve News : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल