महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा, सरकारविरोधात विरोधक रस्त्यावर, राज्यपालांना हटविले तरी भव्य मोर्चा निघेल

महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा

मुंबई : महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा राणीबाग ते आझाद मैदान असा असणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

महाविकास आघाडीने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. मात्र त्याआधी राज्यपालांना हटवले तरी मोर्चा निघणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांचा युतीचा ‘प्रस्ताव’ घेऊन उद्धव ठाकरे मविआच्या बैठकीत?

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे. न भुतो न भविष्यती असा महामोर्चा असेल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

8 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. आमच्या काही घटक पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. सर्व नागरिकांनीही यावे ही विनंती. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकार म्हणून अपयशी राहिले आहेत. महाराष्ट्रातून उद्योग निघत आहेत आणि जे आहेत ते जाण्याची तयारी करत आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.

राज्यपाल हटवले तरी भव्य मोर्चा निघेल

राज्यपालांच्या वादग्रस्त निर्णयावर महाविकास आघाडीने आपली भूमिका निश्चित केली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

सत्ता हस्तांतरणानंतर ही महाविकास आघाडीची पहिलीच पत्रकार परिषद आहे. 17 डिसेंबरच्या मोर्चात समाजवादी पक्षाचे अबू आझमी, कपिल पाटील, शेतकरी मजूर पक्षाचे जयंत पाटील आदी सर्व घटक पक्ष सहभागी होणार असल्याचे या पत्रकार परिषदेत ठरले.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, काल निर्णय झाला आणि आज बैठक बोलावली आहे. 17 तारखेला शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांची बेताल वक्तव्ये सुरू आहेत. त्याचा निषेध केला जाईल.

Maharashtra Update : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वाची भेट, काय झाली चर्चा ?

राज्यपाल कोश्यारी यांना केंद्र सरकारने हटवले तरी 8 ते 18 डिसेंबर दरम्यान मोर्चा काढण्यात येईल, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

नांदेडमधील देगलूरच्या लोकांनी आम्हाला तेलंगणात जाणार असे कधीच सांगितले नाही. आता ती गावे बोलू लागली आहेत. सांगली, सोलापूरचे लोक बोलू लागले आहेत. गुजरातच्या सीमेवरील लोकही बोलू लागले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे, नेते बेताल बोलत आहेत, त्यामागे मोठे षड्यंत्र आहे. सरकारचे अपयश लपविण्यासाठी राज्यपाल व नेते जाणीवपूर्वक बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.