पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पावसाची समस्या नसलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले.
उदयपूरच्या चिंतन शिविरात सोनिया गांधी यांची घोषणा काश्मीर ते कन्याकुमारी ‘भारत जोडो यात्रा’
त्यामुळे आता मराठवाडा आणि विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण ज्या भागात पावसामुळे समस्या निर्माण होऊ शकतात तेथील निवडणुकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.