मुंबई : शिवसेनेतील ठाकरे गटनेत्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर यांचे वरळीतील गोमाता नगर येथील कार्यालय आणि घर सील करण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई महापालिकेने एसआरए कायद्यांतर्गत किशोरी पेडणेकर यांचे कार्यालय आणि घर सील करून ते एसआरए विभागाच्या ताब्यात दिले आहे.
एसआरए योजनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एसआरए योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांचे वरळीतील संबंधित वादग्रस्त फ्लॅट सील केले आहेत.