सभापती सत्ताधारी पक्षाला झुकत माप देतात, हे सरकार विरोधकांना लक्ष्य करते : अजित पवार

Speaker tilts ruling party, govt targets opposition: Ajit Pawar
सभागृहात सभापती सत्ताधारी पक्षाला बोलण्याची संधी देत होते. विरोधी पक्षाला संधी दिली जात नव्हती. शेवटी त्यांना आठवण करून दिल्यावर त्यांनी मला बोलण्याची संधी दिली.

नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. या निलंबनाविरोधात विरोधक एकवटले आहेत. सरकार अन्याय करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

यावर बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, जयंत पाटील यांची 32 वर्षांची कारकीर्द आहे. आम्ही त्यांना जवळून पाहतो.

त्यांचा स्वभाव शांत, संयमी असतो. पण, त्यांना टार्गेट करून निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांच्या कामात तुम्ही निर्लज्ज असल्यासारखे का वागत आहात.

काही दिवस चर्चा होऊ द्या. विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्या; असे ते म्हणत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

सभागृहात सभापती सत्ताधारी पक्षाला बोलण्याची संधी देत होते. विरोधी पक्षाला संधी दिली जात नव्हती. शेवटी त्यांना आठवण करून दिल्यावर त्यांनी मला बोलण्याची संधी दिली.

पण त्यानंतर भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. सभापती सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात. मात्र, विरोधी पक्षाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली पाहिजे. तो त्याचा अधिकार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही पुढे यावे, असेही अजित पवार म्हणाले.

आदित्य ठाकरेंविरोधात एसआयटी नेमण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी माहिती देण्यास सांगितले. पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू असेही अजित पवार म्हणाले.

हे सरकार विरोधकांना लक्ष्य करते. यावरून साऱ्या राज्याला सरकारचा हेतू दिसून येतो आहे. दिशा पटानी प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. आता हा विषय पुनः काढू नका, असे दिशाच्या पालकांनी सांगितले.

आमच्या मुलीचा असा उल्लेख करू नका, अशी पालकांनी विनंती केलेली असताना पुन्हा एकदा सरकारने दिशा सालियन प्रकरण उकरून काढले आहे.

तुमच्या राजकारणासाठी एखाद्या मुलीला टार्गेट करू नका, आम्ही त्या पालकांच्या बाजूने सरकारला सांगत आहोत, सरकार सुडाने वागत आहे.

सत्ता त्यांच्या मालकीची वाटत आहे. हम करो तो कायदा असे सत्ताधाऱ्यांचे वागणे सुरु आहे. सत्तेत असल्याने पोलिस यंत्रणा त्यांच्या हातात आहे. सर्व विरोधी पक्षांचे सदस्य आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहेत.

पवार कुटुंबातील दोन सदस्यही त्यांच्यासोबत आहेत. मी फक्त एक स्पष्ट माणूस आहे, ते उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

जिथे चूक असेल तिथे मी त्याला स्पष्ट सांगणार, चुकीचे काम करू देणार नाही, कोणी दबाव आणत असेल तर दबावाला बळी पडणार नाही, असे अजित पवार म्हणाले.